spot_img
spot_img

राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- डॉ.लक्ष्मण सिंग कृषी विज्ञान केंद्रात फळबाग कार्यशाळा

लोणी दि. २७ (प्रतिनिधी ):-राष्ट्रीय बागवाणी बोर्डच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन पुढे जातांना फळबागेचे नवे तंञज्ञान अवगत करुन या माध्यमातून प्रगती करावी.केंद्र सरकार देखिल फळबाग योजनेला चालना देत आहे त्यांचा लाभ घ्या असे प्रतिपादन राष्ट्रीय बागवाणी बोर्डचे सहसंचालक डाॅ.लक्ष्मण सिंग यांनी केले.
    

कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि राष्ट्रीय बागवाणी बोर्ड, विभागीय कार्यालय पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे फळ उत्पादकांसाठी आयोजन कार्यशाळेत डाॅ.लक्ष्मण सिंग बोलत होते. माणिक पाटील संचालक, राष्ट्रीय बागवाणी बोर्ड संचालक माणिक पाटील, , विभागीय कार्यालय महासंचालक डाॅ.ए.के.सिंग केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ श्री शैलेश देशमुख उपस्थित होते. 
आपल्यामार्गदर्शनातडाॅ.सिंग म्हणाले,बदलत्या हवामानाचा विचार करतांना यापुढे शेती क्षेञाला नव्या तंञज्ञानाची गरज आहे.बागवाणी विभाग कायमचं शेतक-यासोबत आहे.केंद्र सरकार हे शेतीसाठी पायाभूत सुविधा देत आहे यांचा लाभ घेऊन पुढे जा असे सांगितले.
 यावेळी सेंट्रल बॅन्क, अहमदनगरचे विभागीय प्रमुख शैलेद्र सिन्हा यांनी बॅन्केच्या फळबागे संदर्भात कर्ज पुरवठ्याबाबत योजनांची माहिती दिली. तसेच श्री माणिक पाटील यांनी राष्ट्रीय बागवाणी बोर्डच्या विविध योजना आणि त्यांच्या यशोगाथांची माहिती दिली.
मृदा विज्ञान विभाग प्रमुख श्री शांताराम सोनवणे यांनी अन्नद्रव्ये व्यवस्थापन या विषयी सविस्तर माहिती दिली. या निमितीने कृषि विज्ञान केंद्रांतर्गत कार्यरत नर्सरी युनीटला भेट देवून माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय बागवाणी बोर्डचे पुणे विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए.के.सींग यांनी केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!