20.9 C
New York
Sunday, August 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

मालमत्तेवर कर्जाचा बोजा चढविल्याने बापलेकाने केली व्यवस्थापकाला जबर मारहाण चिकणी येथील बापलेकावर शहर पोलि सात गुन्हा दाखल

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- जमिन तारण ठेवून पतसंस्थेकडून घेतलेल्या २१ लाख ५० हजार रुपयांच्या कर्जापोटी कोणताही परतावा न केल्याने तारण मालमत्तेवर बोजा चढविला. त्याचा राग मनात ठेवून चिकणीच्या एका बाप लेकाने दंडेलशाही करीत थेट संगमनेरा तील एका पतसंस्थेत मनसोक्त धिंगाणा घातला. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकाने वारंवार वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याच धुंदीत असलेल्या त्या दोघांनी बलराम सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक पद्माकर मतकर यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात त्या दोघा बापलेकाच्या विरोधा मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांची माहिती अशी की बुधवारी दुपारीसाडेतीन वाजण्याच्या सुमारास शहरातील अकोले बायपास रस्त्यावरील बलराम सहकारी पतसंस्थेत कर्मचारी नियमित कामकाज करीत असताना साडेतीनच्या दरम्यान संजय लक्ष्मण वर्पे व त्याचा मुलगा गौरव हे दोघेही कार्यालयामध्ये आले. त्यांनी थेट व्यवस्थापक पद्माकर वसंत मतकरयांच्या दालनात जाऊन त्यांना आरेरावीची भाषा करु लागले. संजय वर्षे याने; ‘तु आमच्या शेतजमिनीवर जप्ती बोजा का चढविला असा सवाल करत माझ्या मुलाच्या नावा वर असलेल्या जमिनीवर बोजा का दाख वला असे दरडावून त्या दोघांनी व्यवस्था पक मतकर यांना विचारले

पतसंस्थेचे व्यवस्थापक मतकर यांनी जमिनी वर बोजा कसा चढला हे फाईल पाहील्या नंतर लक्षात येईल असे समजू तीने सांगत त्यांना त्यांच्या कर्जप्रकरणाची फाईलही दाखवली.आणि तुम्ही चार वर्षां पूर्वी पत संस्थेकडून जमिन तारण ठेवून २१ लाख ५०हजारांचे कर्ज घेतले आणि त्यानंतर त्या पोटी एकही हप्ता ही तुम्ही भरला नाही. त्यामुळे नियमानुसार ही प्रक्रिया झाल्याचेही व्यवस्थापक मतकर यांनी वर्पे यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर कर्जदार संजय वर्पे याने व्यवस्था पक मतकर यांची कॉलर पकडून त्यास  अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करत,तुझा कार्यक्रमच करतो अशीधमकी दिली. त्याचवेळी त्याचा मुलगा गौरव याने टेबलवरील काचेचा पेपरवेट उचलून व्यव स्थापक मतकर यांच्या दिशेने भिरकवला, मात्र ते वेळीच खाली वाकल्याने त्यांचे डोके काचेच्या टेबलावर आपटल्यानेकाच फूटून मतकरांच्या डोक्याला गंभीर दुखा पत झाली व त्यातून रक्तस्राव सुरु झाला,. यावेळी पतसंस्थेतील महिला कर्मचारी व्यवस्थापकाच्या मदतीला धावल्या. मात्र बापलेकाने त्यांनाही अर्वाच्य भाषेत शिवी गाळ कराड धुडगूस घालून टेबलवरील काचा फोडून इतर सामान आणि कागद पत्रांची नासधूस केली. आणि निघून गेले त्यानंतर अन्य कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक मतकर यांना रुग्णालयात नेवून उपचार केले.

याप्रकरणी सायंकाळी उशिराने बलराम सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक पद्माकर मतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी संजय वर्पे व त्याचा मुलगा गौरव वर्पे या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!