राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):-एकरुखे येथे राहाता चितळी रोडवरील कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात ढंपरने ऊसतोड मजुरांच्या बैल गाडीस जोरदार धडक दिल्याने बैल गाडीतील तीन ऊसतोड मजुर गंभीर जखमी तर एक बैल जागीच ठार झाला आहे यावेळी धडके नंतर चालकाने अपघातग्रस्तांना दवाखान्यात न नेता किंवा पोलिस स्टेशनला खबर न देताच ढंपरसह चालक पसार झाला आहे .
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सहा ऊसतोड बैलगाड्या शुक्रवारी ऊस तोडणीसाठी मजुरांसह पहाटे पाच वाजेच्या दरम्यान राहात्याच्या दिशेने जात आसतांनाच पाठी मागुन भरधाव वेगात आलेल्या ढंपर चालकास वाहन निंयञित न झाल्याने बैलगाडीस जोराची धडक बसली आहे यामध्ये सविता सुरेश राठोड वय (३५) संतोष गबरु राठोड वय(३३) व राहुल शिवाजी राठोड राहणार चाळीसगाव हल्ली मुक्काम गणेशनगर साखर कारखाना हे जखमी झाले आहे सदर बैलगाडीस धडक दिल्या नंतर ढपंर चालक ढंपरसह पसार झाल्याने त्याला शोधण्याचे आवाहन पोलिसांन समोर निर्माण झाले आहे.अपघातस्थळी राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षिक काकड यांनी पाहणी करत तपासाच्या सुचना दिल्या आहेत अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी रुग्नविहिकेद्वारे साईबाबा सुपर हॉस्पिटल शिर्डी येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृतीस्थिर असल्याचे समजते . अज्ञात ढंपर चालकाविरोधात संतोष राठोड यांच्या फिर्यादी नुसार राहाता पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजि.१३५/२०२४ भा.द.वि. कलम २७९,३३७,४२९,४२७ १३४(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ.अशोक झिने हे करत आहेत.
गणेश कारखान्याच्या वतीने सर्व ऊसतोड मजुर, बैलजोडी व बैलगाडीचा विमा आगोदर उतरविण्यात आला असून सदर अपघातग्रस्त ऊसतोड मजुरांचा दवखान्याचा खर्च व नुकसानभरपाई त्याव्दारे होणार असून शक्य तेवढी मदत श्री गणेश कारखान्याच्या वतीने करण्यात येणार आहे.
अनिल गाढवे
(संचालक श्री गणेश स.सा.कारखाना)