कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ):-देशाचा विकास साध्य करतान,गावाच्या विकासाला प्राधान्य देण्याचे काम विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केले असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
फत्याबाद येथे सुमारे १कोटी २८ लाख रुपयांच्या विकास कामाचा आणि जल जीवन योजनेच्या माध्यमातून ३२कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थीतीत करण्यात आला.याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष दिपक पठारे सरचिटणीस नितीन दिनकर संपतराव चितळकर पाणी पुरवठा योजनेच्या अध्यक्षा मनीषा पारखे शरद नवले बाळासाहेब हरनोळ रामदास देठे भाऊसाहेब वडीतके संरपंच पांडूरंग आठरे सविता वडीतके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता.केंद्र सरकारने याचेच अनुकरण करून ग्रामीण विकासाला मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने गावांचा चेहरा मोहरा आता बदलत असल्याचे चित्र देशात निर्माण झाले आहे.शहरी आणि ग्रामीण आशी दरी कमी करण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करीत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राने समाजातील शेवटचा घटक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणला.सरकारचा कोणताही निर्णय लोकांच्या हितासाठी असल्याचे त्यांंनी सांगितले.
मागील दहा वर्षात सुरू असलेल्या योजनाचा लाभ नागरीकांना मिळत आहे.देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलै जाते या योजनेला पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून नैसर्गिक आपती मध्ये नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्म घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प आपल्या सर्वाना करायाचा असल्याचे आवाहन विखे पाटील यांनी याप्रंसंगी फत्याबाद ग्रामस्थांच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.