श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – जनतेच्या आशीर्वादाने आपणास या मतदार संघात आमदार म्हणून कम करण्याची संधी मिळाली. चार वर्षात मतदार संघात आपण कोट्यावधी रुपयांची कामे केली. रस्ते, वीज, पाणी यासह अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. शाळांना एलएफडी, गावागावात व्यायाम साहित्य दिले. मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभा केला. विकासाचा हा रथ यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
तालुक्यातील भामाठाण, बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द येथे आमदार लहु कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा आ. कानडे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रसे कमिटीचे कार्यध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरूण पाटील नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, नानासाहेब रेवाळे, सरपंच अशोक भोसले, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, गेली साडे चार वर्ष कुठल्याही भानगडीत न पडता तालुक्यात असलेले प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. कामांच्या बाबतीत भेदभाव केला नाही. माझ्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा तालुक्यातील जनतेचे प्रश्न, रस्ता, विज ,पाणी, महीला व तरुणांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष देवुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात अजुन पुष्कळ कामे करावायाची आहेत. अनेक ठिकाणी कामाचे श्रेय लाटण्याची स्पर्धाच सुरु झालेली असते त्यामागे टक्केवारी हे वेगळेच कारण असते. शासनाचा निधी हा एकदाच येत असतो त्यामुळे कामे दर्जेदार करा, हा सर्वसामान्यांचा पैसा आहे याबाबत जनतेत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तालुक्यातील भामाठाण येथील तलाठी कार्यालय इमारत लोकार्पण 30 लक्ष रुपये, इंदिरानगर दलित वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण 10 लक्ष रुपये, अडबंगनाथ देवस्थान येथे भक्तनिवास 10 लक्ष रुपये, सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे 5 लक्ष रुपये. तसेच बेलापूर बुद्रुक येथे गोखलेवाडी अंतर्गत कुर्हे नवीन ट्रान्ंसफार्मर 10.24 लक्ष, सातभाई वस्ती अंतर्गत बागवान नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण 8.51 लक्ष, बेलापूर खुर्द येथे रा. मा. 36 ते ग्रा. मा. 30 बेलापूर खुर्द केशव गोविंद बन रस्ता दोन कि.मी. लोकार्पण 100 लक्ष रुपये, ग्रा.मा. 180 ते बेलापूर खुर्द भगत वस्ती ते देशमुख पुजारी वस्ती रस्ता करणे 10 लक्ष रुपये, वडाळा महादेव तलाठी कार्यालय इमारत लोकार्पण 30 लक्ष, भोकर तलाठी कार्यालय इमारत लोकार्पण 30 लक्ष, भोकर वडाळा महादेव रस्ता 10 लक्ष, भोकर विधाटे वस्ती अंगणवाडी इमारत बांधकाम 25 लक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्या 3 दुरुस्त करणे 3 लक्ष तसेच खिर्डी तलाठी कार्यालय इमारत लोकार्पण 30 लक्ष अशा विविध विकास कामांचा शुभारंभ आ. लहू कानडे यांच्या हस्ते झाला.
यावेळी सरपंच वैशाली पवार,कृष्णा पवार, अविनाश पवार,सचिन पवार,ज्ञानेश्वर पवार, उत्तमराव पवार, सी.वाय. पवार, सुदाम पटारे, सरपंच शीतल पटारे,संदीप गांधले,प्रताप पटारे,डॉ. अभंग,आप्पासाहेब जाधव,बाबा पोखरकर,रामदास शिंदे, दिलीप पटारे,लहानू मोरे,राजू लोखंडे, सरपंच सुनीता कांबळे,उज्वला शिंदे, मंदा कांबळे, बाबासाहेब कांबळे,गंगाभाऊ पवार,भास्कर हळनोर, हरिभाऊ रेवाळे,लक्ष्मण पिसे,साहेबराव हळनोर, दिल्पी हळनोर,भरत जाधव, अप्पासाहेब माकोने,हरून बागवान, गंगाधर बनसोडे, सरपंच दिनकर बनसोडे,गोकुळ बनसोडे,असगर सय्यद,उत्तमराव बनसोडे, राजू काझी,प्रकाश दोषी,प्रकाश जाधव,विजय बनसोडे, ज्ञानेश्वर सांगळे,दिलीप नजन,गोकुळ आनंदा बनसोडे, विलास सवई आदींसह महिला व नागरिक उपस्थित होते.