श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत होत्या असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा .उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की शैक्षणिक व समाज सुधारणांच्या चळवळीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे योगदान दिले. सावित्रीबाई फुले प्रभावशाली कवयित्री, आदर्श शिक्षिका, निस्वार्थी व धडाडीच्या समाजसेविका, स्त्री पुरुष समानतेच्या प्रणेत्या होत्या. सावित्रीबाईंनी ज्ञानदानाचे कार्य यशस्वीपणे पार पाडून देशापुढे एक नवा आदर्श निर्माण केला.
याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मा.नगरसेवक दिलीप नागरे, राजेंद्र सोनवणे, अशोक जगधने, सुरेश ठूबे, डॉ राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, नजीर शेख, रियाज खान पठाण, भगवान जाधव, भैयाभाई अत्तार, युनूस पटेल, पुंडलिक खरे, जाफर शहा, वैभव पंडित, विशाल साळवे, राजेश जोंधळे, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.