श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. त्या समाजसुधारक, शिक्षणतज्ञ कवयित्री व लेखिका होत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत महिलांचे अधिकार सुधारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्त्री शिक्षणात त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक संजय छल्लारे, कलीम कुरेशी, मुक्तार शहा अशोक थोरे उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना अहमदनगरला शिक्षणासाठी पाठविले होते. त्यानंतर त्यांनी मुलींसाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांना स्त्री वादाची जननी मानले जाते. त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या योगदानामुळे आज महिला विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करीत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सुधीर वायखिंडे, दीपक कदम, असलम सय्यद, रज्जाक पठाण, भैय्या शहा, लखन भगत, सिद्धांत छल्लारे, स्वामीराज कुलथे, तेजस बोरावके, रमेश घुले,बापू बुधेकर, विक्रांत गंगावल, संजय साळवे, शरद गवारेआदींसह मान्यवर उपस्थित होते