23.1 C
New York
Thursday, August 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरेच्या सौरभ जोंधळे यांची अग्नीवीर मध्ये निवड प्रवरा स्पर्धा परिक्षा केंद्रामुळे स्वप्नपुर्ती

लोणी दि.११( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य, विज्ञान आणि संगणक महाविद्यालय आश्वी खुर्द या महा विद्यालयात महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पोलीस/आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे निमगावजाळीचे कु सौरभ कैलास जोंधळे यांची अग्नीवीर मध्ये निवड झाली आहे.

बालाजी प्रतिष्ठान,निमगांवजाळी यांच्यावतीने अध्यक्ष भानुदास धनवटे, उपाध्यक्ष अनिल दिंडोरे, राजेंद्र लंगोटे,ग्रामपंचायत सदस्य दिलीप डेंगळे , सचिव गंगाराम धनवटे यांनी गावच्यावतीने सौरभचा सत्कार केला.

ना.विखे पाटील यांनी प्रवरा स्पर्धा परिक्षा केंद्राव्दारे दिलेल्या सुविधामुळे हे यश मिळाले असल्याचे सौरभने सिंगितले.यासाठी प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे, डाॅ. आर.ए.पवार, डाॅ.शैलेश कवडे,डाॅ.महेश खर्डे,क्रिडा संचालक प्रमोद विखे यांचे मार्गदर्शन लाभले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!