8.2 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

केळीफाटा ते ठाणगाव रस्ता रस्ता सामुदायिकरित्या उखडून टाकणार ग्रामस्थांचा इशारा

अकोले( जनता आवाज वृत्तसेवा ):-अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील केळी फाट्यापासून ठाणगाव पर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून या कामात सुधारणा झाली नाही तर आम्ही ग्रामस्थ सामुदायिकपणे जाऊन रस्त्याचे काम बंद करून हा रस्ता सामुदायिक पणे उखडून टाकणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे

या निकृष्ट रस्त्याच्या कामाच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक होऊन टोकाचा निर्णय घेतला आहे झालेला रस्ता उखडून टाकून पुन्हा रस्ता करण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे या रस्त्यासाठी केळी रूमनवाडी ठाणगाव माळुंगी पाचपट्टा तिरडे या परिसरातील लोकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून या परिसरातील नागरिक खा. सदाशिव लोखंडे आ. डॉ. किरण लहामटे जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमा बाजीराव दराडे तसेच शिवसेना उबाठा गटाचे विधानसभा अध्यक्ष मधुकर तळपाडे तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  दराडे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन दराडे यांचे कडे सातत्याने पाठपुरावा करीत होते

काम मंजूर झाले त्यावेळेस श्रेय घेण्यासाठी आमदार आणि खासदार यांच्या समर्थकांमध्ये मोठी चढाओढ लागली होती मात्र जनतेला रस्ता कोणा कडूनही झाले तरी चालेल मात्र रस्ता होणे गरजेचे आहे अशी भावना व अपेक्षा नागरिकांमध्ये होती त्यामुळे लोक आमदाराने केलेल्या उद्घाटनाप्रसंगी व खासदारांनी केलेल्या उद्घाटनावेळी असे दोन्ही वेळेस समशेरपुर परिसरात उपस्थित राहून उद्घाटने करतात असे असले तरी या रस्त्याच्या कामासाठी पैसे उपलब्ध होऊन सुद्धा रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे पुन्हा रस्ता जैसे थे होणार असल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक दिसत आहे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे

 

या परिसरातील सरपंच व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या व भावना समजून घेऊन रस्त्याच्या कामात त्वरीत सुधारणा करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत लवकरच मी स्वतःही या रस्त्याची पाहणी करणार आहे

(आमदार डॉ किरण लहामटे)

केळी फाटा ते ठाणगाव या रस्त्यावर ठेकेदाराकडून वापरण्यात आलेली खडी बारीक होती ती आता बंद केली असून गुणवत्ता साठी अंदाजपत्रकामध्ये असलेल्या साईज मध्येच खडी वापरावी व कामाचा दर्जा सुधारावा अशी शक्यता देतो संबंधित काम करणाऱ्या एजन्सीला दिली आहे 

श्री महेंद्र वाकचौरे

( उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले)

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!