13.8 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

मढी बु., चांदगव्हाण व जेऊर पाटोदा, माहेगाव देशमूख व मळेगाव थडी येथे आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ४.२६ कोटीच्या रस्ते व विकासकामांचे भूमिपूजन संपन्न अनेक वर्षापासून प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिक आनंदी

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव शहरासह मतदार संघातील रस्त्यांच्या विकासासाठी शेकडो कोटीचा निधी देवून आ. आशुतोष काळे यांनी विकसित मतदार संघ म्हणून कोपरगाव मतदार संघ नावारूपाला येत आहे. रस्ते व विविध विकास कामांचा आ. आशुतोष काळे यांचा सपाटा सुरूच असून मतदार संघातील मढी बु.चांदगव्हान, जेऊर पाटोदा, माहेगाव देशमुख, मळेगाव थडी या गावातील जवळपास ४.२६ कोटीच्या रस्ते व विकास कामांचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन संपन्न झाले आहे.

यामध्ये मढी बु. येथे ५० लक्ष रुपये निधीतून रस्त्यांच्या कामाचे व १ कोटी १६ लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे, चांदगव्हाण येथे २० लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे व २० लक्ष रुपये निधीतून रस्त्यांच्या कामाचे, जेऊर पाटोदा येथे ३० लक्ष रुपये निधीतून ईशान्यनगर ते ज्ञानेश्वर बाचकर घर रस्ता डांबरीकरण करणे व २० लक्ष रुपये निधीतून सखाराम आव्हाड घर ते माधव केकाण घर रस्ता खडीकरण करणे. माहेगाव देशमुख येथे १० लक्ष रुपये निधीतून चारी नं. ५ ग्रामा ३० ते कुंभारी शिव गोकुळ घुले घर रस्ता खडीकरण करणे, १० लक्ष रुपये निधीतून चारी नं. ५ ते गणपत रोकडे घर रस्ता खडीकरण करणे, १० लक्ष रुपये निधीतून चारी नं. ५ बबन रायभाने घर ते शंकर ठाकरे घर रस्ता खडीकरण करणे, १० लक्ष रुपये निधीतून प्रजिमा ८५ डॉ. कापरे ते विजयराव कदम चारी नं. ५ रस्ता खडीकरण करणे, १५ लक्ष रुपये निधीतून मुस्लिम कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे, ५० लक्ष रुपये निधीतून एम.डी.आर ८५ बाबासाहेब पानगव्हाणे घर ते ज्ञानेश्वर खैरनार वस्ती रस्ता डांबरीकरण करणे, १० लक्ष रुपये निधीतून चारी नं. ५ कदम वस्ती ते कोळपेवाडी शिव रस्ता खडीकरण करणे, एमडीआर ८५ बाबासाहेब पानगव्हाणे घर ते ज्ञानेश्वर खैरनार वस्ती रस्त्यावर सीडी वर्क करणे, १० लक्ष रुपये निधीतून चारी नं. ६ ज्ञानेश्वर खैरनार वस्ती ते सुनिल जाधव वस्ती रस्ता खडीकरण करणे व १५ लक्ष रुपये निधीतून कोळपेवाडी माहेगाव शिव ते मारुती काळे वस्ती (चर रस्ता) खडीकरण करणे, मळेगाव थडी येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या मळेगाव थडी कमान ते गोदावरी नदी रस्ता डांबरीकरण करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे संचालक, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माहेगाव देशमुख व मळेगाव थडी, मढी बु., चांदगव्हान व जेऊर पाटोदा येथील विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

कोपरगाव मतदार संघात मागील साडे चार वर्षात झालेला विकास मतदार संघातील नागरिकांना सुखावणारा आहे. मागील काही वर्षात मतदार संघातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिक अक्षरश: वैतागले होते. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न कधी मार्गी लागणार याची नागरिक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र मतदार संघाच्या विकासाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावाला न्याय देतांना प्रत्येक रस्त्यांसाठी निधी देवून कित्येक रस्त्यांचा विकास साधला आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न कायमचा मिटल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!