10.3 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहुरीत सामाजिक संघटनेच्या वतीने मोतीबिंदू शिबिचे आयोजित १३५ पेशंट घेतला लाभ

राहुरी- (जनता आवाज वृत्तसेवा):-   राम रामेश्वर फाउंडेशन दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी राम डेंटल क्लिनिक राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू निदान दंत व कान तपासणी शिबिराचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय भाऊ तमनर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक सार्व मंथन संपादक मा. अनिल भाऊ कोळसे हे होते.पाहुण्यांचा परिचय व स्वागत राम रामेश्वर फाउंडेशन चे डायरेक्टर मा. अक्षय गिरगुणे यांनी केले. या शिबिरात आनंद ऋषीजी नेत्रालय चे डॉ. सचिन शेलार यांनी ४५ नेत्र तपासणी करून १२ पेशंट शस्त्रक्रियेसाठी पाठविले.आतापर्यंत ८२ शिबिर यशस्वी झाले असून, ४७९० इतकी शस्त्रक्रिया मोफत केलेल्या आहेत. दंत रोगाच्या ३० पेशंटची तपासणी डॉ. महेश इघे यांनी केली. कर्ण रोगाच्या ६० पेशंटची तपासणी डॉ. प्रभाकर वावरे यांनी केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इगेसर प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत गिरगुणे, यांनी केले मधुकर घाडगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सामाजिक संघटना राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी काम करत आहेत परंतु याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी संत गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये शिबिराचे आयोजन केले जात असते त्याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे .

या शिबिरात तालुकाध्यक्ष योगेश लबडे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी, प्रभाकर बरे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इघे सरांनी केले तर उपस्थितांचे आभार रवींद्र भुजाडी यांनी मानले.

.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!