श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान होते असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते.
ससाणे पुढे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे मराठी मनाचे मानबिंदू, महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारे, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारे आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातील समाजाला लोकशाहीच्या ताकतीचे भान देणारे द्रष्टे नेते होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती.
याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मा. नगरसेवक के.सी. शेळके,अशोक जगधने, सुरेश ठुबे, नजीरभाई शेख, डॉ. राजेंद्र लोंढे, अमोल शेटे, सुनील साबळे, नवाज जहागीरदार, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, संजय गोसावी, योगेश गायकवाड, विशाल साळवे, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, तीर्थराज नवले,सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.