10.3 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

सोनईत नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन. 

सोनई ( जनता आवाज वृत्तसेवा):- मुळा सहकारी साखर कारखाना कामगार वसाहत ग्राउंडवर युवा नेते उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि १० पासुन टेनिस बॅाल क्रिकेट स्पर्धा उदयनदादा गडाख युवामंच, गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब,यश ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

मा सभापती सुनिल गडाख, शिनाई  देवस्थान भानसहिवरेचे हभप आवेराज महाराज,हंडिनिमगाव देवस्थानचे हभप रमेशानंदगिरी महाराज व युवा नेते उदयन गडाख यांचे हस्ते या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी १६ संघाने सहभाग घेतला असून प्रथम पारितोषिक ५१ हजार, द्वितीय पारितोषिक ३१ हजार, तृतीय पारितोषिक २१ हजार, चतुर्थ पारितोषिक १५ हजार देण्यात येणार असून याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज अशी अनेक प्रकारची वैयक्तिक बक्षीस ठेवण्यात आलेली आहे. उदयन गडाख यांना शुभेच्छा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील गावा गावातून अनेक तरुण,जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रस्ताविक नेवासा तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदय पालवे यांनी केले वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे गडाख यांनी आभार मानले याप्रसंगी नेवासा तालुक्यातील पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते व युवकांनी पुष्पगुच्छ ,पुस्तके देवून गडाख यांचा सत्कार केला.

याप्रसंगी सरपंच धनंजय वाघ, मुळा कारखान्याचे संचालक काका डफाळ,मुळा कारखान्याचे जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले,प्रा. विनायक देशमुख,पत्रकार सुनिल दरंदले,पत्रकार राहुल राजळे,प्रा.विलास घावटे, भाऊसाहेब बानकर, मा सरपंच राजेंद्र बोरुडे, संजय गर्जे,महावीर चोपडा,अशोक शिरसाट,अल्लु इनामदार यांचेसह मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी व खेळाडू उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!