श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आधुनिक महाराष्ट्राची उभारणी झाली. त्यांच्या प्रेरणेने राज्यात सहकार क्षेत्राची भरभराट झाली आणि ग्रामीण महाराष्ट्रात सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडले. त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्मिती करुन नवनेतृत्वाला राजकारणात आणून राजकीय व सामाजिक क्रांती घडविली, असे प्रतिपादन अशोक सहकारी बँकेचे चेअरमन अॕड.सुभाष चौधरी यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर येथे स्व.यशवंतराव चव्हाण यांचे पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर अध्यक्ष नाना पाटील व भास्कर खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अॅड्.उमेश लटमाळे, बाळासाहेब शिंदे, नवाबभाई शेख, संदीप डावखर, प्रमोद करंडे, कैलास भागवत, अमोल कोलते, ज्ञानदेव वर्पै, पंकज देवकर आदी उपस्थित होते.
अशोक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व.यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी निमित्त व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक संतोष देवकर, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, चीफ अकाउंटंट मिलिंद कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअर कृष्णकांत सोनटक्के, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, विलास लबडे, दत्तात्रय तुजारे, कैलास नाईक, चंद्रकांत दांगट आदी उपस्थित होते.