संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- मागील भांडणाच्या कारणावरुन झालेल्या वादात जमावाच्या तावडीमध्ये सापडलेल्या मित्राच्या मदतीसाठी धावले ल्या तरुणावर ११ जणांनी कोयता आणि दगडाने प्राणघातक हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. या तुंबळ हाणामाऱ्या २ जण गंभीरित्या जखमी झाले आहे .या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसात ११ जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्नासह गंभीर कलमान्वये गुन्हादाखल केला असून ५ जणांना मंगळवारी पहाटे अटक केली आहे.तर ६ जण फरार झाले आहेत.
संगमनेर शहर पोलिसांची माहिती अशी की मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगरमध्ये मालदाड रोड वरील तिरंगा चौकामध्ये राहणारा हुसैन बाबामियां शेख (वय 19) हा तरुण लक्ष्मी नगर मध्ये राहणारा त्याचा मित्र धिरज पावडे यास भेटण्यासाठी तो आला होता. त्यावेळी त्याचे नीलेश काथे याच्याशी झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणांच्या जमावाने धीरज पावडे याला मारहाण करण्यास सुरुवात केली मित्राला मारहाण होत असल्याचे पाहुन हुसैन शेख हा पावडे याच्या मदतीला धावला असता घोळक्यातील तरुणांनी हुसेन शेख यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरु वात केली. त्याच वेळी गोट्या उर्फ प्रशांत घेगडमल याने त्याच्याकडील कोयत्याने शेख याच्या उजव्या हातावर वार केला तर. नीलेश काथे, अविनाश काथे, ओम काथे व साहील देव्हारे या चौघांनी धीरज पावडे याच्या डोक्यात दगड मारत त्यास जखमी केले.
जखमी झालेले दोघांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले अन त्यांनी त्यांच्या मारामाऱ्या सोड विल्या रक्तभंबाळ अवस्थेत त्या दोघांना ही उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. या मारहाणीत हुसैन शेख हा गंभीर रित्या जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी रुग्णा लयात जावून जखमी हुसेन शेख याच्या जबाबा वरून गोट्या उर्फ प्रशांत पोपट घेगडमल(वय २६कासारवाडी) ,प्रथमेश अशोक पावडे (वय 21, रा.नवीन नगर रोड), सनी चंद्रशेखर तरटे(वय 31, रा. गोल्डनसिटी), अविनाश सोमनाथ मंडलिक (वय 29, रा.ढोलेवाडी), सौरभ राजेंद्र फटांगरे (वय 26, रा. इंदिरानगर गल्ली नं.7), नीलेश काथे, अविनाश काथे, ओम काथे, साहील देव्हारे, ऋषि धिमते व अरबाज पठाण (सर्व रा. संगम नेर) अशा ११ तरुणांच्या विरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी धरपकड करत पहाटे प्रशांत घेगडमल प्रथमेश पावडे सनी तरटे अविनाश आणि सौरभ फटांगरे या ५ जणांना अटक केली आहे उर्वरित सहा जण फरार आहे त्यांचाही पोलीस कसूर शोध घेत आहे या घटनेचा अधिक तपास पो नि भगवान मथुरे यांच्या मार्ग दर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहे.
संगमनेर शहरा नजीक असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारातील.लक्ष्मीनगर हा परिसर वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत येत आहे या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीं चा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी या परिसरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे