म्हैसगांव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी तालुव्यातील कोळेवाडीत येथे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने शेतकारी श्री हेमत तुकाराम मळभळ यांचे दि ११मार्च रात्री १० च्या सुमारास गट नंबर क्षेत्र मधील – १ एकर २० गुठे गव्हाची आरण पेटुन दिली गेल्याचा प्रकार घडला आहे या मध्ये शेतकाऱ्याचे मोठे ( अंदाजे १५ पोते )गव्हाचे नुकसान झाले त्यामध्ये सर्व पिक जळून खाक झाले गेले आहे .
कोळेवाडी मधील तलावाच्या बाजूला असलेल्या अनेक शेतामध्ये गव्हाचे , कांदेचे , घास ,मका ,अशी पीके घतली जातात मळभळ यांनी या वर्ष या ठिकाणी या वर्ष गव्हाची परणी केली होती त्यांनी गव्हाची चांगली पिकाची मशागत चार महिने केली त्यानंतर रोजगारांच्या साह्याने सोंगणी केली हे सर्व झाल्यामुळे त्या पिकाला मशीनीच्या साह्याने मळून काढण्यासाठी एका ठिकाणी गोळा केले होते आज मशीन मळून देणार होते पण रात्री कुणी तरी सर्व वळई पेटून दिली त्यामुळे सर्व वळई मधील गहू व पीक जळून खाक झाले यामुळे शेतकऱ्याला होणाऱ्या गव्हापासून वंचित राहण्यास भाग पडले या व्यक्तीला यामधील साधा एक गहू पण पाहू शकला नाही त्यामुळे हा व्यक्ती दुःखी झाला .
याअगोदर या शेतीत असलेल्या त्याच्या विहिरीमध्ये कुणी तरी त्याची स्वतःची मोटरीचा वायररफ ‘ काढून घेऊन मोटर विहिरी सोडली , पाईप पण कापले , कटावटी काढून विहिरीत फेकून दिल्या हा प्रकार दोन महिन्यापूर्वी घडला होता परंतु हे कोण करतय हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे हा प्रकार कायम चालत राहिला तर या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होऊ राहू शकते या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही ही घटना पाहण्यासाठी कोळेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच डॉ . जालिंदर घिगे , प्रविण मरभळ , विशाल मरभळ , सचिन मरभळ, नामदेव वायळ , किरण कोरडे , गणेश वायळ यांनी पाहणी केली .