13.8 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेवासा तालुक्यातील लोखंडी फॉल नजीक ओम साई हॉटेल चालकाचा खून

नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा तालुक्यातील लोखंडी फॉल जवळील ओम साई हॉटेल मालकाचा खून झाल्याची घटना घडली आहे .

याबाबत  माहिती अशी की, श्रीरामपूर ते नेवासा रस्त्यावर बाळासाहेब सखाहरी तूवर ( वय ६० ) यांचे ओम साई या नावाने हॉटेल लोखंडी नजीक कारवाडी परिसरात असून या हॉटेल व्यवसायातून तूवर हे आपला उदरनिर्वाह करीत होते. मंगळवार दिनांक १२  मार्च रोजी दिवसभर हॉटेलचा व्यवसाय करून रात्री हॉटेल बंद करून झोपले होते. मात्र बुधवार दिनांक १३ मार्च सकाळी आठ वाजता हॉटेल का उघडले नाही अ ज्ञात व्यक्तीने दर दरवाजातून डोकावून पाहिले असता बाळासाहेब तुवर यांच्या डोक्याला मार लागून डोक्याभोवती व कानात रक्त दिसून आले. अज्ञात व्यक्तीने हे पाहून त्याने नेवासा तालुका पोलीस स्टेशनला कळवून याबाबत माहिती दिली. नेवासा तालुका पोलीस स्टेशनचे पीआय धनंजय जाधव यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

पीआय धनंजय जाधव यांनी घटनेची बाब गंभीर असून याचा उलगडा होण्यासाठी श्वान पथक व फिंगरप्रिंट पथक यांना पाचरण केले. सदर घटनेचा पंचनामा करून तुवर यांचा मृत्यू देह शवविच्छाधनासाठी पाठवला आहे घटना नेमकी कशामुळे घडली हे मात्र कळू शकले नाही याचा पुढील तपास पीआय धनंजय जाधव करीत आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!