10.3 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

थोरात कारखान्याचा ९ लाख मे. टन ऊस गाळप व १० लाख क्विंटल साखर निर्मितीचा टप्पा पार

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकूल परिस्थिती असतानाही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन 2023- 2024 या गळीत हंगामात 130 दिवसात 9 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 10 लाख क्विंटल साखर उत्पादित केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन व राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष प्रतापराव ( बाबा ) ओहोळ यांनी दिली आहे

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चालू हंगामासाठी उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे गळीत हंगाम 100 दिवस ही चालणार नाही असे चित्र दिसत होते. परंतु मध्यंतरी झालेली पावसामुळे हंगामाच्या दिवसात वाढ झाली तसेच हेक्‍टरी ऊस उत्पादनातही 15 ते 20 टन वाढ झालेली आहे.

थोरात कारखान्यावर कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा असलेला विश्वास यामुळे गळीतासाठी पुरेसा ऊस मिळालेला आहे.

हा हंगाम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालण्याचा अंदाज असून एकूण ऊस गाळप 10 लाख मेट्रिक टना पर्यंत जाईल .चालू हंगामात 8 कोटी 18 लाख युनिट वीज उत्पादन करून 5 कोटी ३६ लाख युनिट वीज मंडळात सात रुपये नऊ पैसे या दराने विक्री करण्यात आलेली आहे. दैनंदिन साखर उतारा 12.80% असून सरासरी साखर उतारा 11. 35 टक्के मिळाला आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून झालेली निळवंडे धरण व त्यांच्याच प्रयत्नातून झालेल्या डाव्या आणि उजव्या कालव्यामुळे आलेल्या पाण्याने कार्यक्षेत्रामध्ये पिण्याचे पाणी व चाऱ्याच्या व्यवस्था होण्यास काही प्रमाणात मदत झालेली आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी जाणारा ऊस थांबून गळीतासाठी ऊस क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.

पुढील हंगामात 2024-25 साठी जास्तीत जास्त लागवड करण्यासाठी कारखान्याने 1.50 रुपये प्रतिरोप या दराने व नवीन लागवडीसाठी अमृत शक्ती दाणेदार खत सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादकांनी घेऊन जास्तीत जास्त खोडवा पीक ठेवून नवीन ऊस लागवड क्षेत्रात वाढ करावी असे आवाहनही कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!