spot_img
spot_img

पायरेन्स आय बी एम ए च्या चार विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत विद्यार्थ्याची निवड

लोणी दि.२५ (प्रतिनिधी):-पायरेन्स आय बी एम ए लोणी येथील एमबीए अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखतीत वरिना हेल्थकेअर आणि बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीमध्ये निवड झाली आहे. वरिना हेल्थकेअर कंपनीमध्ये मध्ये श्री संतोष लहामगे यांची निवड झाली आहे.

त्यांना वार्षिक २ लाख २६ हजारांचे पॅकेज मिळालेले आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स या कंपनीमध्ये श्री आकाश ओव्हाळ कु.कल्याणी गोल्हार आणि श्री अजिंक्य खरात या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना वार्षिक दोन लाख १६ हजारांचे पॅकेज मिळालेले आहे. अशी माहीती पायरेन्स संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी दिली.

 विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन पायरेन्स आयबीएमएमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांबरोबर अभ्यास इतर परंतु अभ्यासपूरक असे विविध उपक्रम राबविले जातात बाहेरील स्पर्धांमध्ये आपले अस्तित्व कसे सिद्ध करावे याबाबत विद्यार्थ्यांना तज्ञ प्राध्यापक वर्ग नेहमीच मार्गदर्शन करत असतात याचाच परिणाम म्हणून पायरेन्स आयबीएमेच्या विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होत आहे. महिन्याभरापूर्वी पायरेन्स आय बी एम ए च्या एमबीए अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या एकोणावीस विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत स्टेट स्ट्रीट एचसीएल सर्विसेस पुणे या कंपनीत फायनान्शियल एनालिस्ट या पदावर निवड झाली होती यातून विद्यार्थ्याप्रति असलेली बांधिलकी संस्था वारंवार सिद्ध करत आहे .
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुप्रिया ताई ढोकणे पाटील पायरेन्स सचिव आणि संचालक डाॅ. निलेश बनकर, यांनी अभिनंदन केले आहे.
मला मिळाले योग्य मार्गदर्शन तसेच विविध सुविधा.अभ्यासक्रमाबरोबर विविध करीअर संधी ,वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे मला हे यश मिळाले.
        {कल्याणी गोल्हार}
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!