संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रहिवाशी आणि शिवसेनेचे जिल्हा संघटक निळवंडे पाटपाणी कृती समितीचे सचिव. विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांची जिल्हा नियोजन मंडळावर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली.
कर्मवीर प्रतिष्टान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय सामाजिक कामाला सुरुवात केलीमागील बारा निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी मिळ वून देण्याच्या लढ्यामध्ये त्यांचा पुढाकार राहिलेला आहे. तळेगाव परिसरातील भोजापूर प्रकल्पचे पुनरनिर्माण करण्या साठी ते शासन दरबारी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा सदाशिव लोखंडे यांच्यासूचनेनुसार जिल्हा नियोजन मंडळ सदस्यपदी त्यांची निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




