10.3 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हेवाडी रोड मारहाण प्रकरणी तिघांवर आर्मॲक्ट गुन्हा नुसार दाखल आरोपी फरार मारहाण करणारे अटक न झाल्याने हिंदुत्ववादी तरुण आक्रमक

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड वरील नाटकी नाल्याजवळ एका समाजा च्या जमावाने दुसऱ्या समाजाच्या तीन तरुणांना तलवार व लोखंडी रॉडने जबर मारहाण करत जखमी केले हिंदुत्ववादी संघटनेचे तरुण आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलीस उपा अधीक्षकांच्या आदेशानंतर रात्री उशिराने तीन जणांवरती जबरी कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यानंतर जमाव पांगला आणि वातावरण निवळले मात्र अद्याप मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली नाही त्यामुळे विरोधी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड सुकेवाडी शिवारात राहत असणारा राहुल सोपान गुंजाळ हा आपल्या दोन मुलींना त्यांच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला घेऊन कोल्हेवाडी रोडने संगमनेरकडेजात होता. त्याचवेळी नाटकीनाला कडून कोल्हेवाडी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या विना नंबर पिकअकप चालक अल्फाज शेख याने राहुल गुंजाळ यांच्या मोटरसायकलला कट मारला याचा जाब विचारला असता पिकअपचालकाने पुढे जात राहुल याच्या मोटारसायकलला पिकअप आडवीलावून तू माझ्याकडे रागाने का पाहत होतास असे दरडावून म्हणत अरेरावी करत शिवी गाळ करून त्यांच्या २ लहान मुलीं देखत मारहाण केली त्यामुळे त्या दोन्ही मुली मोठमोठ्याने रडत होत्या त्याची थोडी ही दया माया त्यास आली नाही.

पिकअप चालक अल्फाज शेख याने फोन करून त्याच्या काही साथीदारांना बोलावून घेतले त्यानंतर ,अरबाज कुरेशी समद कुरेशी याच्यासह चार ते पाच जण घटनास्थळी आले आणि अल्फाज शेख यांनी अमोल गुंजाळ यास जिवे मारण्या च्या हेतूने तलवार उगारली असता गुंजाळ यांनी तो वार हुकवला त्यामुळे फार मोठा अनर्थ टाळला त्यानंतर परिसरात राहणारे गुंजाळ यांचे नातेवाईक घटनास्थळी आले त्यांनी त्या मारामाऱ्या सोडविल्या आणि जखमींना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.

एका समाजाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही तरुणांनी हिंदू समाजाच्या तरुणांना मारहाण केल्या असल्याची माहित वाऱ्या गत शहरात पसरली. त्यानंतर शहरातील तरुण मोठ्या संख्येने शहर पोलीस ठाण्यात जमा झाले. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नाही असा पवित्रा हिंदुत्ववादी तरुणांनी घेतला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते मात्र संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे नगर येथील मुख्यालयात मीटिंग साठी गेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच ते सायंकाळी उशिराने शहर पोलीस ठाण्यात आले आणि सर्व हिंदुत्व वादी तरुणांना शांत करत पुणे शहराची शांतता भंग करू नका आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जाईल कुणा लाही सोडले जाणार नाही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असा विश्वास संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सर्व हिंदुत्ववादी तरुणांना दिला त्यानंतर सर्व जमाव पांगला आणि अखेर राहुल गुंजाळ यांच्याकडे देऊन संगमनेर शहर पोलिसात पिकअप चालक अल्फाज शेख,अरबाज कुरेशी ,समद कुरेशी याच्या सह इतर चार ते पाच जणांवर आर्म ॲक्ट खाली   सह तर गंभीर कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र तिघेही फरार झाले आहे त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कलबुर्गे संगमनेर पोलीस ठाण्यात हजर झाले आहे ते शहरातील कायदा सुव्यवस्था अशी आबादित राहील यावर लक्ष ठेवून आहे.

कोल्हेवाडी रोड मारहाण प्रकरणी तीन जणांची नावे निष्पन्न झाली आहे त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आलेली आहे शहरात कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे संदेश पाठवून अफवा पसरू नये.

श्री सोमनाथ वाघचौरे 

पोलीस उपाधीक्षक संगमनेर उपविभाग

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!