संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील मुळगंगा माता मंदिराचा पर्यटन विकासा मध्ये समावेश करण्यात आला असून खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्य मातून या मंदिराला पर्यटन निधीतून दोन कोटी रुपये मंजूर केले असल्याचीमाहिती शिवसेना किसान सेनेचे जिल्हा प्रमुख रामभाऊ राहणे यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरीचे मुळगंगा माता मंदिर हे जागृत देवस्थान आहे या मंदिराचा विकास व्हावा यासाठी शिवसेना किसान सेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ राहणे ,ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे ,शाम राहाणे बाळू सरोदे विलास सरोदे किसन सरोदे यांनी या मंदिराचा पर्यटन विकासामध्ये समावेश करावा अशा मागणीचे लेखी निवेदन खासदार सदाशिव लोखंडे यांना दिले होते त्यानंतर खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मंदिराचा पर्यटन विकासात समावेश व्हावा यासाठी सातत्याने मागणी लावून धरली त्यामुळे या मंदिराचा महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकासामध्ये समावेश झाला असून मंदिराच्या विकास कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा सदाशिव लोखंडे यांचे चंदनापुरी ग्रामस्थांनी आभार मानले आहे