पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-वडनेर हवेली या ठिकाणी चालू असलेल्या कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे यांची झाली. ज्ञानोबा-तुकोबा आदी संतांनी समाजाने दिलेला त्रास सहन केला अपमान सहन केला म्हणूनच ते संत झाले, मोठे झाले. म्हणूनच शेकडो वर्ष झाली तरी त्यांची कीर्ती अजूनही अजरामर आहे. तांबे महाराजांनी अंधश्रद्धा , व्यसनमुक्ती या विषयांवरती आपल्या विनोदी शैलीतून समाज प्रबोधन केले.
याप्रसंगी वडनेर हवेली पंचक्रोशी नगर श्रीगोंदा शिरूर पारनेर तालुक्यातील हजारो भाविक उपस्थित होते.यावेळी श्री. शंतनु भैय्या खांडरे शिरूर यांच्या वतीने उपस्थित भाविकां साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पाच दिवस चालणाऱ्या या भव्य कीर्तन महोत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांनी ज्ञानदान व अन्नदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन वडनेर हवेली ग्रामस्थ व देवस्थानचे अध्यक्ष राहुल सोनुळे उपाध्यक्ष विशाल सोनुळे विश्वस्त अनिल बढे व मार्गदर्शक बाळकृष्ण महाराज सोनुळे यांनी केले आहे.