अकोले (जनता आवाज वृत्तसेवा ):-गोरडे कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण पिंपळगावला आनंद झाला आणि गावाच्या वैभवात भर पडली व गावाचा नावलौकिक वाढला याचे कारण म्हणजे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर निवड झालेल्या कुमारी पूजा केशव गोरडे तिच्या सत्काराला संपूर्ण गाव उपस्थित असणार त्यातच करा आनंद आहे असे गौरव उदगार अहमदनगर जिल्हा परिषदेचे गटनेते व माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाघचौरे यांनी केले आहे
पूजा केशव गोरडे हिची विक्रीकर अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल पिंपळगाव निपाणी ग्रामस्थांनी तिच्या सत्कार सन्मानाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोले पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील वाकचौरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या वाईस चेअरमन सुनीताताई भांगरे व समशेरपुर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुषमा बाजीराव दराडे या उपस्थित होत्या.
याप्रसंगी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन परसराम उगले, पिंपळगाव चे सरपंच दत्तात्रय डगळे, उपसरपंच शांताराम वाकचौरे, पोलीस पाटील संतोष वाकचौरे, पिंपळगाव निपाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र वाघचौरे, जगदंबा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शरद वाकचौरे, राष्ट्रवादीचे नेते तुकाराम गोरडे, पिंपळगावचे माजी सरपंच जालिंदर वाकचौरे, ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नेते भीमाजी तोरमल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव गोरडे यांनी केले.