प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथे बास्केटबॉल लीग स्पर्धा उत्साहात आज संपन्न झाल्या, महाविद्यालयातील प्रत्येक बास्केटबॉल खेळाडूला संधी मिळावी. बास्केटबॉल खेळाडूंनी त्या संधीचे सोने करून आतर महाविद्यालयीन, झोनल, आंतर विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धामध्ये आपले नैपुण्य दाखवून जास्तीत जास्त यश संपादन करावे या उद्देशाने या लीग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संघ भावना वृद्धिंगत करण्यासाठी खेळासारखे दुसरे कोणतेही माध्यम नाही -डॉ. संजय गुल्हाने
लोणी दि.२४ (प्रतिनिधी):- खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. संघ भावना वृद्धिंगत करण्यासाठी खेळासारखे दुसरे कोणतेही सशक्त माध्यम नाही .सातत्य यश संपादन करण्यासाठी सहाय्यभूत ठरते नैपुण्य संपादन करायचे असेल तर सातत्य असणे गरजेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित सरावावर आपले लक्ष केंद्रित करावे त्यामुळे यश प्राप्त करायचे असेल तर संपूर्ण समर्पण गरजेचे आहे सातत्य हाच खरा यशाचा मूलमंत्र आहे असे प्रतिपादन प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी केले.
लिग स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सुनील मिसाळ यांच्या हस्ते झाले यामध्ये पाच ते सहा संघांनी सहभाग घेतला अतिशय चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यांमध्ये टीम वॉरियर संघाने २६-२५ असा प्रवरा बॉईज संघाचा पराभव करून प्रथम स्थान पटकावले तर प्रवरा बॉईज ने द्वितीय स्थान पटकावले टीम वॉरियर संघाकडून पृथ्वीराज शेळके ,गौरव बोरुडे तर टीम बॉईज संघाकडून शुभम कोबरणे या खेळाडूंनी उल्लेखनीय खेळाचे प्रदर्शन केले
क्रीडा संचालक डॉ. श्रीनिवास मोतीयेळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिमखाना सेक्रेटरी पृथ्वीराज शेळके, बास्केटबॉलचा विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक चिंचणे, पंच म्हणून आकाश खराडे तसेच विवेक ब्राह्मणे यांनी काम पाहीले.



