3.5 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील गावांचा डोंगरी विभागात समावेश

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा) :-राहुरी नगर पाथर्डी मददार संघातील ३९ गावांचा डोंगरी विकास विभागात समावेश झाला असल्याची माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

आमदार तनपुरे पुढे म्हणाले की, राहुरी तालुक्यातील तुळापुर ,जांभळी, कणगर बु ,वावरथ, चिंचाळे, मल्हारवाडी, कोळेवाडी ,ताहाराबाद , घोरपडवाडी, म्हैसगांव ,निंभेरे ,दरडगांव थडी ,गाडकवाडी, गुंजाळे, वरशिंदे, चिखलठाण ,वाबळेवाडी व नगर तालुक्यातील जेऊर ,खोसपुरी ,धनगरवाडी, डोंगरगण, ,कापुरवाडी,,उदरमल, मजले चिंचोली, ,पिंपळागांव उज्जैनी ,मांजरसुंबा, ससेवाडी तसेच पाथर्डी तालुक्यातील शिरापुर ,गितेवाडी,कोल्हार , करंजी,घाटशिरस लोहसर,दगडवाडी ,वैजुबाभुळगांव डमाळवाडी या गावांचा समावेश झालेला आहे.

या समावेशामुळे या भागातील गावांचा शैक्षणिक ,दळणवळण, पाणी पुरवठा ,विज आदी विकास कामे होण्यास मदत होणार आहे. शासन नियमानुसार या भागातील क्षेत्रफळ किमान १०० चौ किमी असणे बंधनकारक असते त्यामध्ये डोंगरी भागाचे क्षेत्रफळ २० टक्के पेक्षा जास्त असने आवश्यक असते ह्या दोन्ही अटीही शासनाने शिथील करण्याचा निर्णय घेतल्याने या गावांचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामी अनेक वर्षापासुन आमदार तनपुरे यांच्या प्रयत्नास यश आल्याने लाभार्थी गावातील जनतेने आमदार तनपुरे यांचे आभार मानले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!