spot_img
spot_img

गायीच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाने तेहतीस कोटी देवाचे मिळते पुण्य — ह . भ .प. सोनालीताई करपे

शेवगाव (प्रतिनिधी):- हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जाते, गाई मधे 33 कोटी देवाचे वास्तव्य असल्यामुळे हिंदू धर्मात तिला सर्वजण पवित्र मानतात , तिच्या मृत्यूनंतर तिचे वर्ष श्राद्ध केले , न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम करण्याचे भाग्य मला मिळाले , गाईचे वर्ष श्राद्ध करून मनाचा मोठेपणा दाखवलेल्या दत्तात्रेय बामदळे या शेतकऱ्याच्या कुटुंबास गाई मधील 33 कोटी देवाचे पुण्य मिळणार असल्याचे गौरवोद्गार ह भ प सोनाली ताई करपे यांनी काढले .

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सधन शेतकरी दत्तात्रय मुरलीधर बामदळे या शेतकऱ्याचे गाईचे प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त कीर्तनकार ह भ प सोनाली ताई करपे यांच्या कीर्तना चे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते , त्यावेळी कीर्तनातून प्रबोधन करत होत्या .

बालमटाकळी येथील सदन शेतकरी दत्तात्रय मुरलीधर बामदळे यांनी एक लहान कालवड घेतली होती तिने किमान 19 वेत दिले होते 30 वयानंतर ठीक आहे मरण पावली आपण आजपर्यंत या गाडीची घरातील एक कुटुंबाचा भाग म्हणून तिची सेवा केली आणि तिने देखील आपल्याला दुध दुखत्यासह लहान-मोठे जनावरे दिल्याने गाय ही माय असते म्हणून दत्तात्रय बामदळे यांनी तिच्या मृत्यूनंतर तिची माणसाप्रमाणेच विधिवत पूजा करून अंत्यविधी केला होता व दर महिन्याला गाईच्या नावाने एक मुलगी दर महिन्याला जेवू घालून तिचे वर्ष श्राद्ध करायचे असा विचार त्यांच्या मनात आल्याने मंगळवार रोजी गाईचे वर्ष श्राद्ध निमित्त गाईच्या प्रतिमेचे विधिवत पूजन दत्तात्रय बांमदळे व पत्नी हिराबाई बामदळे व कुटुंबाने केले होते , ह भ प कीर्तनकार सोनाली ताई करपे यांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन करताना म्हटले की , गाय ही माय असते आपण तिच्या नावाने एक मुलगी दर महिन्याला जेवू घालून गाईचं आपल्या घरच्या कुटुंबाप्रमाणे तिचं वर्ष श्राद्ध केल्याने गाई मधील 33 कोटी देवाचे पुण्य या कुटुंबाला मिळणार आहे , आज पर्यंत कधीही हा आगळावेगळा कार्यक्रम कुणीही भविष्यात केला नसावा हा कार्यक्रम माझ्या कीर्तनाने संपन्न झाल्याने मला देखील गाईचे पुण्य व कार्यक्रम करण्याचे भाग्य मिळाले असल्याचे गौरव उद्गार सोनाली ताई करपे यांनी काढले असून ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे पडसाद शेवगाव तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात उमटल्याने बांमदळे कुटुंबीयाचे सर्वत्र कौतुक केल्या जात असून महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असून कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!