5.8 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

पिंपरी निर्मळ येथील ॲट्रॉसिटी व दंगलीच्या गुन्ह्यातील ५७ आरोपींना उच्च न्यायालय खंडपिठाने अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर

पिंपरी निर्मळ: ( जनता आवाज वृत्तसेवा ):–  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील ॲट्रॉसिटी व दंगलीच्या गुन्ह्यातील ५७ आरोपींना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपिठाने दि. ११ मार्च २०२४ रोजी अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

पिंपरी निर्मळ येथे दि.६ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या दंगलीबाबत लोणी पोलीस ठाण्यात ७३ लोंकावर ॲट्रॉसिटी व दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता.यामध्ये पत्रकार डॉक्टर विविध संस्थांचे पदाधिकारी दलित बांधव यांचा समावेश होता.सदर गुन्ह्यात १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना कोपरगाव जिल्हा न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आले होते. या प्रकरणातील सर्वच अटक आरोपींच्या वतीने ॲड . श्री. जयंत जोशी यांनी काम पाहिले होते.

तसेच ५७ जणांचे अंतरीम अटकपुर्व जामीन ३ जानेवारी व १२ जानेवारी २०२४ ला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय खंडपिठात झाले होते.अंतिम जामीनासाठी गेल्या दोन महिन्यांपासुन उच्च न्यायालयात सुनावनी सुरू होती.त्यावर ११ मार्च २०२४ रोजी न्यायालयाने निर्णय देत जामीन कायम केले आहेत.

या प्रकरणात ॲट्रॉसिटी  कायद्याप्रमाणे प्रथमदर्शनी केस नाही, तसेच आरोपींचा गुन्ह्याचे कामी स्पष्ट सहभाग निष्पन्न होत नाही. आरोपींवरचे आरोप राजकीय वादातून असून त्यास वेगळा रंग दिला गेल्याचा युक्तीवाद करुन आरोपीस जामीन मंजुर करावा,असा युक्तीवाद अँड शैलेश चपळगावकर यांनी केला.युक्तीवाद ऐकून घेवून न्यायालयाने जयश्री घोरपडे जयश्री कदम सुनिल घोरपडे कैलास घोरपडे सागर मोरे अर्जुन निर्मळ राजेंद्र निर्मळ शिवनाथ घोरपडे दिलिप पारखे नंदु पारखे अशोक निर्मळ सह ५७ आरोपींचा अटकपूर्व अंतिम जामिन तपासात सहकार्य करणे पुराव्यांशी छेडछाड न करणे या अटीवर मंजुर केला आहे.

याकामी अरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ,ॲड शैलेश चपळगावकर ॲड अविनाश बारहाते पाटील अँड व्ही डी होन  , अँड शुभम कोते यांनी काम पाहिले.

  केवळ राजकीय विरोधक म्हणुन गुंतविले.

  घटनेच्या वेळेला मी गावात नव्हतो मात्र केवळ राजकारणात अडसर नको म्हणुन गावातील माझ्याच नातेवाईक आप्तेंष्टानी फिर्यादीला हाताशी धरून माझे नाव या गुन्हयात गोवले.न्याय देवतेने आम्हांला दिलासा दिला आहे.

    श्री. राजेंद्र निर्मळ.

 (अध्यक्ष युवक काँग्रेस शिर्डी विधानसभा)

सख्ख्या भावासह डझनभर दलितांवरही ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे.फिर्यादीने  सख्खा भाऊ व भाचा यांच्यासह बारा दलितांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत व इतर गुन्हे दाखल केले आहेत.न्यायालयाने या सर्वाचे अंतिम जामिन मंजुर केले.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!