3.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

स्व.शंकररावजी कोल्हे यांचे समाजकारणातील योगदान स्फूर्तिदायक  स्व. कोल्हे यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त अष्टविनायक प्रतिष्ठानने राबविलेला उपक्रम स्तुत्य 

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) :-स्व. शंकरराव कोल्हे साहेबांनी सहकार,समाजकारण, शिक्षण, जलसिंचन, कृषी आदी क्षेत्रात कोपरगाव तालुक्याचा विकास केला आहे, तो विकास नक्कीच दीपस्तंभासारखा उंच आहे. त्याच्या कोणत्याही क्षेत्रात काम करतांना आम्हाला नेहमी त्यांच्या नसण्याची जाणीव व उणीव भासतेच, मात्र त्याच्या त्या क्षेत्रात काम करतांना त्यांचा दुरदृष्टिकोन अनुभवायला मिळत असतो, आणि आज त्यांच्या त्या क्षेत्रात काम करतांना आम्हाला त्यांची प्रेरणा मिळत असून आम्हाला स्फूर्ती देऊन जाते, असे प्रतिपादन सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे सह. कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांनी केले आहे. 

ते शनिवारी (दि.१६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील श्री. छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ अष्टविनायक प्रतिष्ठान वतीने स्व. शंकरराव कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असता ते बोलत होते.

या प्रसंगी श्री.नयनकुमार वाणी, श्री. संजय सातभाई, श्री.संदीप वर्पे, श्री.रवींद्र पाठक, श्री.राजेंद्र सोनवणे, श्री.संजय जगदाळे, श्री.पराग संधान, श्री विजय वाजे, श्री.विजय आढाव, श्री.वैभव आढाव, श्री.शरद नाना थोरात, श्री.स्वप्निल निखाडे, श्री. डी.आर.काले, श्री.रविंद्र रोहमारे, श्री.संदीप देवकर, आदीसह मान्यवर उपस्थित होते.

पुढे कोल्हे म्हणाले की, असेन मी, नसेन मी, माझ्या कार्यातून दिसेल मी अशा उक्तीप्रमाणे स्व.कोल्हेसाहेबांच्या कार्याची आम्हाला सतत आठवण येत असते. त्यांनी आम्हाला समाज कार्य करतांना ८० टक्के समाज कारण करावे, आणि २० टक्के राजकारण करावे, असा मौलिक सल्ला दिलेला आहे, त्यामुळे तो सल्ला आम्ही तंतोतंत पालन करतो, म्हणून आम्ही समाज सेवा धर्म कार्य म्हणुन करतो. कोल्हे साहेबांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमीत्ताने अष्टविनायक प्रतिष्ठानने सामाजिक भूमिकेतून समाज कार्य करीत अमरधाम येथील विसाव्या ओटा, कीर्तनाचा ओटा, तीळ दानाचा ओटा, आदी कामे केली आहेत. खऱ्या अर्थाने कोल्हे साहेबाना अभिप्रेत असं काम केले आहे.

त्याचप्रमाणे स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी निमीत्ताने संजीवनी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वतीने सर्व रोग निदान शिबीर राबविण्यात आले आहे. मोफत मोती बिंदू शस्रक्रिया शिबीर राबविले जात आहे. त्याच प्रमाणे दि.१६ ते २३ मार्च पर्यंत संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन तहसील कार्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. या प्रयोजनांचा नागरिक, रुग्ण, भाविकांनी लाभ घ्यावा असे आवहान सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांनी केले आहे.

या प्रसंगी श्री.विनोद राक्षे, श्री.उल्हास पवार, श्री.सचिन सावंत, श्री.सलीम पठाण, श्री.खलिल कुरेशी, श्री.रुपेश सिनगर, श्री.विकी चोपडा, श्री.शफीक सय्यद, श्री.गोरख देवडे, श्री.चंद्रकांत वाघमारे, श्री.दीपक जपे, श्री.अशोक नायकुडे, श्री.निलेश डोखे, श्री.पप्पू पडियार, श्री. रंजन मामा जाधव, श्री.फकीर महंमद पैलवान श्री.सुखदेव जाधव, श्री.अनिल सुखदेव जाधव, श्री.जयप्रकाश आव्हाड, श्री.वाल्मीक मरसाळे, श्री.सुशांत खैरे, श्री.सागर राऊत, श्री. रवींद्र लचुरे, श्री.विजय चव्हाण, श्री.जॉन गोरे, श्री.शिवाजी खांडेकर, श्री संदीप निरभवणे, श्री.इलियास शेख आदीसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!