पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर येथे सुपा रोडलगत नवीन भव्य न्यायमंदीराचे भुमिपुजन करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती विभा कंकणवाडी व न्यायमुर्ती संतोष चपळगावकर यांच्या हस्ते नवीन न्यायमंदीराचा भुमिपुजन सोहळा नुकताच पार पडला.
पारनेर येथील सुपा रोडलगत पाच एकर जागेवर सुमारे चाळीस कोटी रुपये खर्च करून भव्य ईमारत उभी राहणार आहे. हि ईमारत बांधताना पुढील शंभर वर्षांचे न्यायालयीन कामकाजाच्या क्षमतेचे नियोजन करण्यात आले आहे. न्यायालय परीसरात न्यायालयाची मुख्य ईमारत ,न्यायदान कक्ष , न्यायाधीशांची निवासस्थाने, मुद्देमाल व रेकॉर्ड सुरक्षा कक्ष, खाजगी व सरकारी वकीलांसाठी चेंबर , स्वच्छतागृहे , कॅन्टीन, बगीचा, वाहनतळ अशा सुविधा असणार आहेत. पारनेर येथील न्यायालयाकडे दिवानी व फौजदारी असे सुमारे बारा हजार खटले सध्या प्रलंबित आहेत. नवीन ठिकाणी होणाऱ्या न्यायालयाची ईमारत सर्व सुविधांनी युक्त असल्यामुळे न्यायदानाचे कामाला गती मिळेल अशी अपेक्षा पारनेरचे मुख्य न्यायाधिश राहुल देशपांडे या यावेळी व्यक्त केली.
पारनेरला वरिष्ठ स्तर न्यायालय चालु करण्याची पारनेरकरांची अनेक दिवसांची मागणी आहे. ती पुर्ण करण्याचे दृष्टीने जिल्हा सत्र न्यायालय सर्वोतोपरी सहकार्य करील असे आश्वासन जिल्हा सत्र न्यायाधिश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र बार असोशिएशनचे अमोल सावंत ,जिल्ह्यातील इतर न्यायालयांचे न्यायाधिश , पारनेर बार अध्यक्ष तुषार उबाळे व असोशिएशनचे इतर सर्व वकील बांधव उपस्थित होते. पारनेरचे कनिष्ठ स्थर न्यायालय व पारनेर बार असोसिएशन यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते .
शंभर वर्षांपुर्वीचे न्यायालय आता ईतिहास जमा …. !
पारनेरला सन १९२२ मध्ये ब्रिटीशांनी न्यायालयाची सध्याची ईमारत बांधलेली आहे. तेव्हापासुन येथे न्यायदानाचे अविरत कामकाज चालु आहे.
या ईमारतीने नुकतीच शंभर वर्षे पुर्ण केली आहे, तरीही ईमारत भक्कम आहे. परंतु लोकसंस्था व खटले वाढल्यामुळे येथील सुविधा अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे भव्य व आत्याधुनिक सुविधांनी युक्त न्यायालयाची ईमारत दोन वर्षांत तयार होईल.
या ईमारतीने पारनेरच्या वैभवात भर पडेल. अशी माहिती सा. कार्यकर्ते अँड. रामदास घावटे यांनी दिली.