11.8 C
New York
Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाविकास आघाडीला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जात आहे – उद्धव ठाकरे

मुंबई( प्रतिनिधी):- महाराष्ट्रामध्ये 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते , मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीतील ३ पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात तयारी करावी. तिघांच्या मेहनतीने पुन्हा मविआचं सरकार सत्तेत येईल आणि खोके सरकार पळेल, असे सूचक वक्तव्य केले.

तर महाविकास आघाडीमध्ये १६-१६-१६ जागांचा फॉर्म्युला ठरला नसल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटलेय. तर लोकसभेला ठाकरे गटाचे१९ खासदार असतील असा पुनरूच्चारही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय. यादरम्यान, जागावाटपासंदर्भातील वाद टाळण्यासाठी काळजी घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

तर मविआला डॅमेज करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची धुसफूस अथवा नाराजी नाही सांगितले जाते. परंतु दररोज राष्ट्रवादी अथवा काँग्रेस अथवा शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षांमधील नेते दररोज कोणती न कोणती टिपणी अथवा स्टेटमेंट देत आहे. याचबरोबर मोठा भाऊ लहान भाऊ असाही वाद चालू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे भविष्य अंधारात दिसते. याचाच फायदा भाजप व शिवसेना शिंदे गटास होतो का काय असे चित्र दिसत आहे. परंतु लोकसभेच्या निवडणुकीला बराच काळ बाकी आहे त्यामुळे येणारा काळच ठरवेल.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!