लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- दि २७ /३ / २०२४ रोजी डीवायएसपी शिरीष वमने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की लोणी पोलीस स्टेशन हद्दीत बाभळेश्वर शिवारात ४०० के व्ही जवळ निळवंडे पाटाचे दक्षिणेस काठवणामध्ये काही इसम बेकायदेशीररित्या तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळत आहे अशी खत्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून 3,75000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला
आरोपी नावे खालील प्रमाणे 1) रवींद्र बन्सी आहेर रा लोणी खुर्द तालुका राहता 2) प्रकाश सूर्यभान दुशिंग रा. बाभळेश्वर ( राहाता )3) नानासाहेब ज्ञानदेव निर्मळ रा. पिंपरी निर्मळ (राहाता) 4) नवनाथ रामदास कांबळे रा. पिंपरी निर्मळ ( राहाता ) राहता5) सोमनाथ चांगदेव कोकाटे रा. बाभळेश्वर ( राहाता) 6) गोरख भिवा दरंदले रा. लोहगाव( राहाता ) 7) गौतम सखाराम नवले रा. तिसगाववाडी( राहाता ) वरील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस हवालदार अशोक शिंदे यांचे फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन येथे 189/2024 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम 12 ( अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर मा. वैभव कलूबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शिरीष वमने शिर्डी ए पी आय कैलास वाघ पी एस आय योगेश शिंदे हेड कॉ. इरफान शेख हेड कॉ. अशोक शिंदे हेड कॉ. असिर सय्यदम हेड कॉ. न्सूर शेख हेड कॉ. दिनकर चव्हाण हेड कॉ. निलेश मेटकर पोलीस निरीक्षक श्याम जाधव यांनी केली आहे



                                    