श्रीरामपूर (प्रतिनिधी):- श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी ईश्वरचिठ्ठी ससाणे गटाचे सुधीर नवले यांना कौल मिळाल्यानंतर श्रीरामपूर मध्ये राजकीय घडामोडी घडल्या.
आज सोमवारी सहाच्या अधिकारासाठी झालेल्या संचालकाच्या बैठकीत विखे गटाचे आठ संचालक गैरहजर राहिले. उर्वरित ससाणे गटाचे ६ व मुरकुटे गटाचे ४ अशा दहा संचालकांनी नवले यांच्या सह्याचा अधिकारासाठी समर्थन दिले आहे. विखे गटाचे संचालक गैरहजर राहिल्यामुळे यापुढे श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांना तारेवरची कसरत करावी लागेल.
नवीन नियमानुसार बाजार समितीच्या बैठकीत 18 पैकी किमान 10 संचालक बैठकीसाठी अत्यावश्यक आहे. एक जरी संचालक कमी आला तरी बैठक रद्द करण्याचा नवीन नियम आल्याचे समजते. त्यामुळे उर्वरित ससाणे गट चे 6 व मुरकुटे गटाचे 4 एकूण दहा संचालकांना प्रत्येक बैठकीची वेळेस नित्यनेमान हजर राहावे लागेल.
ही निवडणूक तीन गटाने एकत्र येऊन लढली होती. परंतु सभापती पदावरून ससाणे गटात व विखे गटात एक मत न होऊ शकल्यामुळे तेथे निवडणूक घेण्यात आली. त्यावेळेस दोन्ही गटाच्या उमेदवाराला समसमान मतदान झाल्यामुळे सभापती निवडीचा निकाल हा ईश्वरचिठ्ठीवर गेला. या निवडीच्या वेळेस मुरकुटे गट हा अलिप्त होता. मात्र तो आज बैठकीला हजर होता. विखे, ससाणे, मुरकुटे या तिघांनी एकत्र येऊन निवडणूक लढली होती. परंतु ते आज एकत्र नाही. त्यामुळे भविष्यामध्ये ससाने व मुरकुटे गट हा पण एकत्र राहण्याची शाश्वती नाही. त्यामुळे भविष्यात सभापती सुधीर नवले यांना तारेवरची कसरत करावी लागेल.