19.4 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

७ वर्षांच्या चिमुरड्या बालिकेवर वृद्धाकडून अत्याचार कोपरगाव तालुक्यातील घटना; आरोपीस पोलीस कोठडी

कोपरगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):- अवघ्या सात वर्षांच्या बालिकेवर वृध्दाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी विजय निवृत्ती बर्डे (वय ५०) रा. घोयेगाव, कोपरगाव) या आरोपीस अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

बुधवारी (दि. २७) मार्च रोजी पीडित मुलीचे आई- वडील सकाळी १० वाजता मोलमजुरीच्या कामासाठी जात असताना पीडित मुलीला भावजई व आजोबा यांच्या घरी सोडून मजुरीच्या कामाला गेले. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास पीडित मुलीस घराजवळ राहणारा विजय निवृत्ती बर्डे (वय ५०) याने १० रुपये घे असे म्हणून सदर मुलीस त्याच्या घरात बोलावून घेतले व घराचा दरवाजा आतून लावून तिच्यासोबत लैंगिकअत्याचार केला.त्याचवेळी पीडित मुलीच्या मामीने सदर पीडित मुलीला आवाज दिला असता त्या नराधमाने त्या मुलीला ओरडू नको असा दम दिला.

सदरची घटना मुलीने आपल्या आईला सांगितली अधिक चौकशी केली असता बलात्काराचा प्रकार पुढे आला. याप्रकरणी तालुका पोलिसांत फिर्याद देण्यात आली. कोपरगाव तालुका पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला काही तासांतच रात्री उशिरा अटक केली. काल गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीडित मुलगी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सुचनेनुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पो. नि. संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक मनोज महाजन अधिक तपास करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!