संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-कामगार तलाठ्याला मारहाण करून त्यांच्या ताब्यातील वाळूने भरलेली पिकअप पळवून नेल्याची घटना संगमनेर खुर्द परिसरात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर खुर्द परिसरात कामगार तलाठी संग्राम देशमुख हे त्यांच्या पथका सह गस्त घालत होते. त्यांनी संगमनेर खुर्द येथील तलाठी कार्यालयाकडून प्रवरा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती वाळूने भरलेली एक पिकअप पकडली. यामुळे संतप्त झालेल्या वाळूतस्करांनी देशमुख या कामगार तलाठ्यास दमदाटी करून मारहाण केली त्यांच्या ताब्यातील विना क्रमांकाची पिकअप पळवून नेली ब याबाबत कामगार तलाठी संग्राम देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यात दिले ल्या फिर्यादीवरुन पिकअप वाहनचालक, दुचाकीवरील चालक कैफ पूर्ण नाव गाव पत्ता माहीत नाही व नफीस याचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.