संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- पतीच्या वाढदिवसानिमित्त चला मी तुम्हाला ओवाळते. असे पत्नी म्हणाल्या नंतर मला तुझ्या हातून न ओवळता तिच्या हातून ओवाळायची आहे असे म्हटल्या नंतर त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले .रोजचा वाद,पतीचे असले वागणे आणि मारहाण यामुळे त्रस्त झालेल्या पत्नीने रात्रीच गळफास घेऊ आत्महत्या केलीअसल्याची धक्कादायक घटना. संग मनेर शहरातील कोल्हेवाडी रोड,सुकेवाडी येथे नुकतीच उघडकीस आली आहे या प्रकरणी शहरपोलिसात पतीविरुद्ध आत्म हत्या स्पोर्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
रिना राजेंद्र हाडवळे रा. लिंगदेव, ता. अकोले, हल्ली मुक्काम कोल्हेवाडी रोड सकेवाडी काळे मळा असे पतीच्या वाढ दिवसाच्या दिवशी आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे याबाबत संगमनेर शहर पोलिसांची माहिती आशी की अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील राजेंद्र हाड वळे याच्याबरोबरच रिनाचा विवाह झाला होता तो बी एस एफ मध्ये भर्ती झालेला होता. मात्र, त्यास दारूचे व्यसन लागले असल्यामुळे त्याने नोकरी सोडून दिली होती.त्याचे कायमच पत्नी रीना हिच्याशी भांडणे होत होती.तो तिला सतत मारहाण करुन तिचा शारीरिक मानसिक छळकरत होता त्यामुळे ती कोल्हेवाडी रोडसुकेवाडी येथे माहेरी निघून आली होती.
कालांतराने राजेंद्र हाडवळे हा देखील संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथे राह ण्यास आला होता. दोघांमध्ये समझोता झाला आणि त्यानंतर राजेंद्र हा हिवरगाव पावसाच्या टोलनाक्यावर गणमॅन म्हणून कामाला लागला होता. मात्र, त्याचे काही दारुचे व्यसन सुटले नव्हते. या सर्वाला ती वैतागून गेली होती. तरीसुद्धा सासऱ्याने त्याला घर बांधून दिले . तरीसुद्धा तुझ्या बापाने लग्नात काही दिले नाही त्यामुळे त्यांच्याकडे तू हिस्सा माग असे म्हणून तो तिचा छळ करत होता
दरम्यान राजेंद्र हा त्यांच्या घराजवळ राहणार्या एका मुलीच्या नादाला लागला होता. त्यामुळे या दोघांचे घरात वाद होत होते. त्यामुळे रीनाच्या नातेवाईकांनी राजेंद्र व त्या मुलीला सुद्धा समज दिली होती त्यानंतर त्यांची व्यवस्थित चालले.
राजेंद्र याचा वाढदिवस होता तेव्हा पत्नी रीना त्याला म्हणाली की आज तुमचावाढ दिवस आहे चला मी ताट करून तुम्हाला ओवाळते. त्यावर पती राजेंद्र म्हणाला की
मला माझ्या मोनाच्या हातून वाढदिवस साजरा करायचा आहे. मला तुझ्या हातून ओवाळायचे नाही. असे म्हटल्याचा रीना हिला राग आला या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली याप्रकरणी संग मनेर शहर पोलीसात संपत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र हाडवळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे