राहाता (प्रतिनिधी):– नगर जिल्हा म्हणजे सहकार क्षेत्राचे माहेरघर अशी या जिल्ह्याची ओळख आहे. कारण आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यामध्येच उभारण्यात आला होता.
त्याच अहमदनगर जिल्ह्यामधील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरात प्रथमच आमने-सामने अहमदनगर जिल्ह्याला विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य नवीन नाही, मात्र गणेश कारखान्याच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच आमने-सामने येत आहेत. गेल्या आठ ते नऊ महिन्यापूर्वी राज्यामध्ये जो सत्तांतर घडून आला आहे. या या निवडणुकीला त्याचाच पदर राहील. कारण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे असून, बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचेआहेत. नगर जिल्हा मध्ये सोऱ्याधार्याचे राजकारण चालते. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कधी कुठे काही होऊ शकते. याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. परंतु महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. व खासदार सुजय विखे-पा. या दोघांनी राहता तालुका, गणेश परिसर, व शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फौज फाटा निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांची ताकद म्हणजे सर्वसामान्य जनतेची ताकद.माजी महसूलमंत्र्यांसह राष्ट्रवादी व भाजपच्या आजी-माजी आमदारांच्या भूमिकेमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. याच काखान्यावरील वर्चस्वासाठी जिल्ह्याला विखे-थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्य नवीन नाही, मात्र गणेश कारखान्याच्या निमित्ताने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रथमच आमने-सामने येत आहेत. शिवाय राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे व त्यांचे परंपरागत विरोधक स्व. कोल्हे यांचे नातू तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. यातील तिघा विद्यमान आमदारांच्या शिर्डी, संगमनेर, कोपरगाव मतदारसंघातील गावे ‘गणेश’च्या कार्यक्षेत्रात असल्यानेच कारखान्याची निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
दिवंगत खासदार बाळासाहेब विखे यांची ‘गणेश’वर सत्ता असताना १९८८ मध्ये कारखाना बंद पडला. त्यानंतर सभासदांनी सत्तांतर घडवत माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या गटाची सत्ता आणली. त्यावेळी आजारी कारखाना ‘कोल्हे पॅटर्न’ने ऊर्जेतावस्थेत आला होता. गणेश कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी त्यांचे विखे-पुत्रांचे प्रयत्न सुरू आहेत. कारण कारखाना बंद राहिल्यास त्याचा फटका त्यांना मतदारसंघात बसू शकतो. परंतु गोरगरीब या गणेश कारखान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे कुठलाही परिस्थितीमध्ये सत्ता कोणाची येऊ गणेश कारखाना बंद पडून देऊ नये अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.