श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर पोलीस पथक हद्दितील वाकडी फाटा येथे नाकाबंदी करीत असताना बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या मार्गावर सकाळच्या सुमारास एक संशयीत मोटारसायकल येताना दिसली. सदर मोटारसायकल वरील इसमास पोलीस पथकाने हाताने इशारा करुन व आवाज देवुन थांबण्यास सांगितले असता त्याने मोटारसायकल थांबवली. त्याच्या पाठीवर असलेल्या एका काळया रंगाच्या बॅगेतुन अंमली पदार्थाचा वास येत आल्याने पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ दोन पंच, वजनकाटा धारक, फोटो ग्राफर यांना सदर ठिकाणी बोलावुन घेवुन पंचासमक्ष त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक गाठुसिंग बारेला (वय 45 वर्षे, रा. सावननगर, दिघी, जि. पुणे) असे सांगितले, त्यांनतर पोनि. देशमुख यांनी पंचा समक्षक त्याचेकडील बॅगेची झाडाझडती घेतली. त्याच्या बॅगमध्ये दोन पारदर्शक पॅक केलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला.
सदरचा गांजाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा हा साथिदार नामे रामचंद्र पवार, (रा. शिरपुर जि. धुळे) याच्याकडुन आणला असल्याचे सांगितले. त्याने सदरचा गांजा स्वतःचे कब्जात बाळगण्याबाबत कोणतीही परवानगी नसल्याचे सांगितले. त्याच्याकडुन जप्त करण्यात आलेला गांजा व इतर मुद्देमाल सुमारे 1,46,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुरनं. 413/2024 एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), (ब) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली असुन न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, पो.ना. रघुवीर कारखेले, पो.कों. राहुल नरवडे, पो.कों. गौतम लगड, पो.कों. रमिझराजा अत्तार, पो.कों. संभाजी खरात, पो.कों. अजित पटारे, पो.कों. राम तारडे, पो.कों. मिरा सरग, पो.ना. संतोष दरेकर, पो.ना. सचिन धनाड, पो. ना. वेताळ यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.