लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचा बारावी विज्ञान बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला.शाळेने सलग १७ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून नवा उच्चांक प्रस्थापित केला. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवरा पब्लिक स्कूलचे बारावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण ७१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. बारावीच्या निकालात २१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले, ४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व उर्वरित ४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेची विद्यार्थिनी कु. पायल अजय खर्डे हिने ९०.६७ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ओम शरद निबे याने ८६.६७ % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळवला. तर कु. विधिता दीपक किर्तनी हिने ८५.५० % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
प्रवरा पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजचा बारावी बोर्ड परीक्षेत सलग १७ वर्ष १००% निकाल लागल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,खा.डाॅ.सुजय विखे पाटील, सचिव भारत घोगरे, संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिता विखे पाटील,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे,समन्वयक प्रा. नंदकुमार दळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे प्राचार्य डॉ. बी.बी. अंबाडे, उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी,ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.