श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- अशोक सहकारी साखर कारखाना संचलित व माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील तसेच समन्वयक तथा कारखाना संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालिल अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्टसचा बारावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला. यात श्रावणी नितीन औताडे (७२.५० %) हिने प्रथम, प्राजक्ता बाबासाहेब शिंदे (७०.५० %) द्वितीय, तर श्रावणी संजय उंडे (६९.५० %) हिने तिसरा क्रमांक मिळविला.
अशोक इंग्लिश मिडीयम स्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्टस, प्रगतीनगर या महाविद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा यावेळीही कायम राखल्याचे स्कूलच्या संचालिका तथा अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी सांगीतले. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य संपत देसाई, प्रा.प्रतिभा तागड, प्रा.गणेश हाळनोर, प्रा.सागर कोकणे, प्रा.मधुरा कुंदे, प्रा.रुपाली शिरसाठ, प्रा.कविता राजुळे, प्रा.स्वाती वाबळे, प्रा.सुजाता डावखर, प्रा.अक्षय सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, अॕग्रो इंडस्ट्रीज अँड एजुकेशन फौंडेशनचे अध्यक्ष सोपानराव राऊत, उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक,समन्वयक सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, सचिव विरेश गलांडे, सहसचिव भास्कर खंडागळे तसेच कारखान्याच्या संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.