मुंबई (प्रतिनिधी):– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर वरळीतून निवडणुक लढवायला तयार असतील तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचे चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
मुंबई फुटबॉल असोसिएशन, फुटबॉल ऑस्ट्रेलिया आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासद्वारे आजपासून पुढील दोन दिवस फुटबॉल डेव्हलपमेंटच्या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आलेले आहे. कुपरेज फुटबॉल ग्राउंड येथे हे आयोजन करणअयात आले आहे. या फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राजकीय संघर्षामध्ये एकमेकावर आरोप करणे प्रत्यारोप करणे ही चालू असते. परंतु अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणाची पातळी अतिशय खालच्या स्तरावर गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतो काय असे वाटत आहे.
भाजप नेते सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंना राजीनामा द्या, म्हणत टीका केली होती. राज्य सरकारविरोधात जनमत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. तिथे निवडणूक घेऊ. पोपट मेलेला आहे. शिल्लक आमदारांना राजीनामा द्यायला सांगा. तुम्ही देखील वरळी विधानसभेचा राजीनामा द्या. त्याठिकाणी टेस्ट घेऊ, असे मुनगुंटीवार म्हणाले. त्याचबरोबर
शिंदेंनाच दिले आव्हान
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या आव्हानाला स्विकारत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लढण्याचे आव्हान दिले आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर उभे करणार असेल तर आताच राजीनामा देतो. चला तयारी आहे? असा सवाल करतानाच मुनगंटीवार यांचे सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी त्यांना लगावला. अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ठाकरे गटाच्या बाजूने चार निकाल व एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने एक निकाल असा दिला असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्रातील जनता व मतदार पेचात पडले आहे. त्यातच अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होणे सुरू झाले असल्यामुळे पुढील काळामध्ये राजकीय संघर्ष अतिशय तीव्र होणार.