श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर रित्या वाळू उत्खनन करून नेणारा श्रीरामपूर तालुक्यातील दिघी – चितळी रस्त्यावर श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पकडला. या कारवाईत पोलिसांनी चार ब्रास वाळू आणि एक ढंपर असा एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली आहे.
काल दुपारी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या पोलीस पथकाने चितळी दिघी रोडवर बेकायदेशीर रित्या टाटा कंपनीचा लाल रंगाचा डंपर एम एच 14 डीजे 1116 यामधून गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर रित्या वाळू घेऊन जात असलेला डंपर अडवला. यावेळी पोलिसांनी डंपर चालक नंदू नारायण कोठुळे व डंपरचा मालक (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी डंपर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. यात पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू व टाटा कंपनीचा एमएच 14 बीजे 1116 या क्रमांकाचा डंपर किंमत 4 लाख 50 हजार असा एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त करून नंदू नारायण कोठुळे व डंपर मालक या दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास सुभाष आंधळे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 329/2024 नुसार भादवि कलम 379, 34 व पर्यावरण कायदा कलम 3/15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करत आहेत.