5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरा पब्लिक स्कूलच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…!

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा ) :-लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला. शाळेने सलग १७ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून नवा उच्चांक प्रस्थापित केला. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवरा पब्लिक स्कूलचे एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी एकूण १६४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दहावीच्या निकालात १०३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले, ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व उर्वरित ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेची विद्यार्थिनी कु. मते पियुषा राजेंद्र हिने ९३.२० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. खांदे वैष्णवी प्रभाकर व कु.पवळ श्रुती प्रकाश यांनी ९२.६० % गुण प्राप्त करून विभागून द्वितीय क्रमांक मिळवला. तर कडू रवी बाबासाहेब याने ९१.८० % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

प्रवरा पब्लिक स्कूलने दहावी बोर्ड परीक्षेत सलग १७ वर्ष १००% निकाल लागल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विद्यालयाचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या सी.ई.ओ डाॅ.सुष्मिता विखे पाटील,अतिरिक्त सी.ई.ओ डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे व श्री. नंदकुमार दळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे, उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ, पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी व सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!