राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):-भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीने तहसिल कार्यालया समोर निदर्शान करण्यात आली. आ.जितेंद्र आव्हाड यांनी केवळ फोटोच नाही तर विचार फाडले असल्याने त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदन देवून करण्यात आली.
महाड येथे आ.आव्हाड यांच्याकडून डाॅ.आंबेडकर यांचा फोटो फाडला गेल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. शिर्डी मतदार संघात भारतीय जनता पक्ष, आरपीआयच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. तहसिल कार्यालया समोर आ.आव्हाड यांचे फोटो फाडून जाळण्यात आले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
भाजपाचे तालुका अध्यक्ष दिपक रोहोम, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, कैलास सदाफळ, शिर्डी शहराचे अध्यक्ष सचिन शिंदे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर , सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, मुकूंदराव सदाफळ, अॅड.रघूनाथ बोठे , मोहोनराव सदाफळ, बाबासाहेब डांगे, भाऊसाहेब सदाफळ, शिवसेनेचे सागर बोठे, राहूल गोरे, सतिष बावके, भाजपाच्या महीला जिल्हाध्यक्षा सौ.कांचन मांढरे, सौ.सुवर्णा मोकाशी , आरपीआयचे पप्पू बनसोडे, डाॅ.धनंजय धनवटे, ताराचंद कोते, राजेंद्र धुमसे, दिलीपराव गाडेकर, गणेश निकाळे, भीमराज निकाळे, महेश त्रिभुवन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले की, जिंतेंद्र आव्हाड यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून देशाचा अपमान केला असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मोहोनराव सदाफळ म्हणाले की, आव्हाड यांनी डाॅ.आंबेडकर यांचा फोटो फाडून एकप्रकारे संविधानचा अपमान केला आहे. आपण काय करतो याचे भानही त्यांना राहीले नसल्याची टिका त्यांनी केली.
आरपीआयचे पप्पू बनसोडे यांनी आव्हाड यांच्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांना आंबेडकरी जनता कधीही माफ करणार नाही. अॅड बोठे यांनी परमेश्वर समान असलेल्या डाॅ.आंबेडकर यांचा अपमान करणा-या आव्हाडांच्या विरोधात पोलीस प्रशसानाने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.तहसिलदार अमोल मोरे यांना सर्व पदाधिका-यांनी निवेदन दिले.