5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

युवानेते विवेक कोल्हे आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज करणार दाखल

कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ): – गणेश कारखाना निवडणुकीमुळे राज्यात चर्चेत आलेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे हे आपल्या राजकीय जीवनातील नवीन अध्यायाला सुरवात करत असून आज ते नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत असून नाशिक येथे दुपारी 1 वाजेनंतर ते आपला अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. युवानेते विवेक कोल्हे हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकित कोपरगाव विधानसभा किंवा राहता विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी करतील अशी चर्चा असताना मात्र विवेक कोल्हे यांनी अचानकपणे नाशिक शिक्षक मतदार संघातुन उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यानी सर्वांनाच एक अनपेक्षित असा धक्का देत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे त्याच ते आज अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याने राजकीय क्षेत्रातील सर्वांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहे.

नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. ३१ मेपासून त्याची नोटिफिकेशन जारी होणार आहे. अर्ज भरण्याची ७ जून ही शेवटची तारीख आहे. तर अर्ज माघार घेण्याची तारीख १२ जूनरोजी आहे. २६ जूनला मतदान होणार आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या सह युवानेते विवेक कोल्हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ राजेंद्र विखे-पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केल्याने उन्हाळ्यातील तापमानाबरोबरच शिक्षक मतदारसंघाचे राजकारणही तापणार आहे. सध्या दिगग्ज उमेदवार रिंगणात उतरत असल्याने या निवडणुकीचे सूत्रे थेट मुंबईतून हालतील यात शंकाच नाही.

युवानेते विवेक कोल्हे व राजेंद्र विखे दोघे उमेदवारी करण्यास इच्छुक असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली असून काही दिवसातच भाजपाकडुन कोण उमेदवारी करेल हे चित्र स्पष्ट होईलच मात्र आज विवेक कोल्हे यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची वाट न पाहता थेट पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेऊन राज्याच्या राजकारनात एकच खळबळ उडवून दिली आहे.

विवेक कोल्हे हे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकित कोपरगाव विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी करतील असे जवळपास निश्चित झाले असताना त्यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातुन अचानकपणे उमेदवारी करण्याचे जाहीर केल्याने अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.जर विवेक कोल्हे हे नाशिक मतदारसंघातुन उमेदवारी करणार असतील तर मग येणाऱ्या विधानसभा निवडणूकित कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आ. आशुतोष काळें यांच्या विरोधात कोण उमेदवारी करणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असून पुन्हा माजी आ. स्नेहलता कोल्हेच उमेदवारी करणार का ? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विखे यांच्या उमेदवारीमुळे  जर विवेक कोल्हे यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर न झाल्यास ते अपक्षच निवडणूक लढवणार का ? की इतर पक्षाचा पाठिंबा घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे तसेच कोल्हेची पुढची दिशा काय असणार ? या सारखे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे काही दिवसात मिळतील हे नक्की.

एकंदरीत भाजपकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातुन उमेदवारी करणार असल्याचा पक्का निर्धार केला असून त्यामुळेच त्यानी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत एक मास्टर स्ट्रोक देत राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. विवेक कोल्हे यांच्या या भूमिकेमुळे नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!