8.2 C
New York
Sunday, March 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्लास्टिकच्या ड्रममध्ये तरुणाचा मृतदेह आढळला बारागाव नांदूर येथील घटना; राहुरी पोलिसांत गुन्ह्याची नोंद

राहुरी शहर( जनता आवाज वृत्तसेवा):राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील देवकर वस्तीवरील डावा कालव्याच्या कडेला रविवारी (दि.२) सकाळी साडेसात सुमारास एका १०० लिटरच्या प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने बारागाव नांदूरसह राहुरी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील मुळा धरणातून येणाऱ्या डाव्या कालव्यालगत काल सकाळी साडेसातच्या सुमारास बारागाव नांदूर परीसरातील एक इसम कालव्याच्या कडेने जात असताना त्याला उग्र वास आला. त्याने वासाच्या दिशेने शोध घेतला असता, कालव्याच्या कडेला असलेल्या झुडूपात एका १०० लीटरच्या प्लास्टिक ड्रममध्ये एका मृतदेह दिसून आला. त्या इसमाने तात्काळ पाहिलेल्या घटनेची माहीती जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना मोबाईलवरून कळविली.

गाडे यांनी याबाबत त्वरीत पोलीस प्रशासनाला महिती दिली. त्यानुसार श्रीरामपूरचे अपर पोलीस आधिक्षक वैभव कुलूबमें, उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका प्लास्टिक ड्रममध्ये अंदाजे ३० ते ३५ वर्षीय तरूणाचा नायलॉन दोरीच्या सहाय्याने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

मृतदेह फुगल्याने तो ड्रममध्ये अडकला होता. पोलीस प्रशासनाने ड्रम कापून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मृत व्यक्तीच्या अंगावर अनेक प्राणघातक वार केल्याचे दिसून आले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी परिसरातील प्रचंड गर्दी केली होती. या दररम्यान नगर येथील ठसे तज्ज्ञ पथक व श्वान पथकाने घटनास्थळी येऊन आरोपीचा माग घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र दुपारपर्यंत आरोपींचा कोणताही सुगावा हाती लागला नाही. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तरुणाचा खून करून मृतदेह त्या ठिकाणी आणून टाकला असावा, असा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

मृतदेह कोणाचा आहे? कुठला आहे? त्याचा खून करणारे कोण? कोणत्या करणातून त्याचा खून केला. हे सर्व गुलदस्त्यात आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!