संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- मुल नको असल्याने गर्भवती पत्नीला बळजबरीने गोळ्या खायला घालून तिचा गर्भ पाडण्याचे अघोरी कृत्य पतीसहसासू सासऱ्यांने केले.याप्रकरणी घारगाव पोलि सात पतीसह सासू- सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शुभम साहेबराव हुल वळे (रा. दरेवाडी, ता. संगमनेर) याला पालिसांनी अटक केली आहे, मात्र सासू अर्चना व सासरा साहेबराव हुलवळे हे दोघे पती- पत्नी पसार झाले आहेत.
याबाबत घारगाव पोलिसांची माहिती अशी की संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दरेवाडी येथील रहिवासी असं णाऱ्या अश्विनी शुभम हुलवळे विवाहि तेला तीन वर्षाचा मुलगा आहे. ती पुन्हा गरोदर असताना, ‘आपल्याला मुल नको,’ असे म्हणत तिच्या पतीने पत्नीचा नकार असताना तिला जबर मारहाण केली.पोटा तील गर्भ काढण्यासाठी तिलासासूसासरा आणि पतीने मारहाण करुन, बळजबरीने तिच्या तोंडात गोळ्या टाकल्या.गोळ्या खाल्ल्यानंतर तिला रात्री पोटामध्ये त्रास होऊ लागला. म्हणून तिला साकुर येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल कर ण्यात आले होते. दोन दिवस उपचार कर ण्यात आले, परंतू प्रकृतीत सुधारणा न झाल्याने संगमनेर येथे मोठ्या दवाखान्या मध्ये ण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी नणंद सोनाली गुळवे व पती शुभम यांनी विवाहितेला पुन्हा संगमनेर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल नेले. सोनोग्राफी करुन, इंजेक्शन व गोळ्यादिल्यानंतर सायंकाळी तिला घरी आणले, मात्र तिला पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला. यामुळे सुमारे १० दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. अशा बिकट परिस्थितीत सासू-सासऱ्यासह पतीने तिला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.या अघोरी कृत्या मुळे पिडिने थेट घारगाव पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी तिला पुढील उपचारा साठी प्रवरा हॉस्पिटल येथे ठिकाणी पाठविले.
उपचारानंतर पिडितेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या नंतर घारगाव पोलीसात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी तिचा पती सासू सासरा या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसेच पती शुभम याला अटक करण्यात आली आहे, मात्र सासू-सासरे पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.