23.7 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपुरात मुख्याध्यापिकेला ४५  हजाराची लाच घेताना पकडले…

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला ४५  हजार रुपयांची लाज घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडण्याचा प्रकार आज बुधवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडला आहे.

शहरातील बोरावके कॉलेज मागील परिसरातील सुभद्राबाई गायकवाड शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार वय- ५३  यांनी तक्रारदाराला वेतनश्रेणीच्या फरकाचे एक  लाख ६३  हजार माझ्याच प्रयत्नाने मंजूर झाले असे म्हणत त्या बदल्यात ५०  हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ४५  हजार रुपयाची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू असून सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाने केल्याचे समजते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!