शिक्षणांबरोबर विद्यार्थ्याना नोकरी उपलब्ध करुन देण्यावर प्रवरेचा कायमचं भर राहीला आहे.विविध सुविधा देत असतांना औद्योगिक क्षेञासाठी कुशल मनुष्यबळ देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघटना,विविध कंपन्यासोबत सामजस्य करार विविध चर्चासञ आणि व्याख्यानातून परिपुर्ण विद्यार्थी घडविण्यावर संस्थेचा भर राहीला आहे.यामुळे शिक्षणांसोबत ग्रामीण भागातील मुलांना नामांकीत कपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्याना प्लेसमेंट विभागाचे प्रा,राजेंद्र बेलकर, प्रा. दीपक चंद्रे ,प्रा. शरद रोकडे, प्रा. ऋषिकेश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रवरेच्या सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ९२ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड
लोणी दि.१९ (प्रतिनिधी):-उराशी स्वप्न बाळगून जिद्द, प्रेरणा, आणि आकांक्षा यांचा मेळ साधत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालय, चिंचोली येथील संगणक, केमिकल आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी “प्लेसमेंट ड्राईव्ह २०२२-२३ मध्ये सहभाग नोंदविला याव्दारे ९२ विद्यार्थ्याची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्ती झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. बी. शिंदे यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील ,सह सचिव भारत घोगरे,मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ  यांनी अभिनंदन केले आहे.




