24.7 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहुल झावरेंसह २४ लंके समर्थकांना अंतरीम जामीन अ‍ॅट्रसिटीसह विनयभंगाचा दाखल झाला होता गुन्हा

नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):-नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या २४ सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रॅसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजुर केला.

राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे, कारभारी पोटघन, दादा शिंदे, बापू शिर्के, बाजीराव करखीले, किशोर ठुबे, दीपक लंके, दत्ता ठाणगे,लखन ठाणगे, अक्षय चेडे, बंटी दाते, श्री गंधाक्ते, संदेश बबन झावरे यांच्यावर दि. ७ जुलै रोजी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात पारनेर तालुक्यातील गोरेगांव येथे दि. ६ जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या वतीने नगरच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सतिश गुगळे, अ‍ॅड. अभिषेक भगत, अ‍ॅड. अरूण बनकर, अ‍ॅड. गणेश कावरे, अ‍ॅड. स्नेहा झावरे यांनी काम पाहिले. घटना दि. ६ जुलै रोजी घडलेली असताना गुन्हा मात्र दि. ७ जुलै रोजी पारनेर ऐवजी नगर येथे उशिरा दाखल करण्यात आला. फिर्यादीत नमुद तारखेस घटना घडली त्याच दिवशी या फिर्यादीमधील आरोपी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यासंदर्भात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यास विरोध करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तसेच या गुन्हयास राजकीय रंग असल्याचे आरोपींच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी न्यायालयापुढे विविध आरोपी घटना घडली त्यावेळी कोणत्या ठिकाणी होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज, या फिर्यादीमधील आरोपी राहुल झावरे यांना झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ तसेच ते आजूनही अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याबाबतच्या बाबी वकीलांनी न्यायालयापुढे कथन केल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना अंतरीम जामीन मंजुर केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!